सभापती व आमदार यांनी एमआयडीसीचा प्रश्न सोडवावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार – जिल्हाध्यक्ष अशोक सावंत जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियान शुभारंभ

0
484

जामखेड न्युज—–

सभापती व आमदार यांनी एमआयडीसीचा प्रश्न सोडवावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार – जिल्हाध्यक्ष अशोक सावंत

जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियान शुभारंभ

 

जामखेड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा व बेरोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसी चा प्रश्न सभापती प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार यांनी सोडवावा अन्यथा जामखेड च्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी दिला.

आज जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियान शुभारंभ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे, महिला जिल्हाउपाध्यक्ष, सुजाता कदम, अहिल्यानगर तालुकाध्यक्ष अशोक चौभे, साईनाथ भगत कार्यालय सचिव, वाल्हेकर ताई,
महेश निमोणकर तालुकाध्यक्ष जामखेड, तालुकाउपाध्यक्ष बापुराव शिंदे, युवक तालुकाध्यक्ष सुरज रसाळ, स्मीता वाघेकर, सचिन ढेरे, वसंत डोळे, संतोष मोहळकर, आनंद राजगुरू, ऋषी कुंजिर यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना अशोक सावंत म्हणाले की,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सभासद नोंदणी करत आहोत.
राज्याच्या तिजोरीची चावी माझ्या नेत्यांकडे आहे त्यामुळे यापुढे जामखेडकरांवर अन्याय होणार नाही. राजकारणातील खरा पांडुरंग अजित पवार आहेत. जामखेड या दुष्काळी तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरावयाचा आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी तसेच बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी एमआयडीसी साठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार आहे प्रश्न सुटला नाही तर महेश निमोणकर च्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे केले जाणार आहे.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष महेश निमोणकर म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांच्या मार्गदर्शनाखाली मी 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करत आहे. रोहित पवार हे केवळ अजित पवार यांच्या मुळेच आमदार झालेले आहेत. या तालुक्यात पंचवीस ते तीस वर्षे कुकडीच्या पाण्यावर राजकारण झाले तरीही प्रश्न सुटलेला नाही. आता अजित पवार यांच्या माध्यमातून आपण कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार आहोत. जामखेड तालुक्यात सर्वात जास्त सभासद नोंदणी करणार असल्याचे निमोणकर यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना म्हणाले की, सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांचे कार्य चांगले आहे. त्यांच्या माध्यमातून जामखेड परिसरात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत आहे. 

यावेळी बोलताना उपाध्यक्ष बापुराव शिंदे म्हणाले की, जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून अभियान यशस्वी करू

महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर म्हणाल्या की, अजित पवार ( दादा) हे कामाचे आहेत, अहोरात्र काम करतात, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या त्या सोडवा, आपला पक्ष म्हणजे दादाच आहे.

युवती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे
बोलताना म्हणाल्या की,

जामखेड परिसरात अजित पवार यांना मानणारा गट मोठा आहे. याचा फायदा घेऊन संघटना मजबूत करू येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या पक्षाला झुकते माप मिळाले पाहिजे कारण आतापर्यंत दादा च्या निधीचा इतरांनी फायदा घेतला
आहे आता आपण जनतेचे प्रश्न सोडवून संघटना मजबूत करू.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोहळकर यांनी तर आभार सुरज रसाळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here