प्रेम पेरलं तर बंधुता उगवते – तहसीलदार गणेश माळी प्रा. मधुकर राळेभात मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचा कार्यक्रम संपन्न

0
224

जामखेड न्युज—–

प्रेम पेरलं तर बंधुता उगवते – तहसीलदार गणेश माळी

प्रा. मधुकर राळेभात मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचा कार्यक्रम संपन्न

रमजान महिना हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना असतो या महिन्यात सर्व मुस्लीम बांधव एक महिन्याचे निरंकार उपवास करून नमाजाचे पठन करतात . दर वर्षी प्रमाणे गेली 30 वर्षापासून मधुकर आबा राळेभात यांच्यावतीने सर्व मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचा कार्यक्रम खर्डा रोड लगत मक्का मस्जिद येथे 23 व्या उपवासाचा दिवशी आयोजित करण्यात आला . तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरिक्षक महेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी तहसीलदार गणेश माळी बोलतांना म्हणाले की गेल्या 30 वर्षा पासुन प्रा . मधुकर आबा राळेभात इफ्तार पार्टीचा कार्यक्रम घेत असुन प्रेम पेरलं तर बंधुता उगवते धर्मापेक्षा माणुसकी मोठी आहे . हे प्रा मधुकर राळेभात यांनी या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून दाखवून दिले या ठिकणी सर्व जाती धर्मातील नागरीक एकत्र होऊन रोजाची सांगता करतात हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असुन प्रा मधुकर राळेभात मित्र मंडळची प्रेरणा घेणे हि काळाची गरज आहे . माणुस हिच खऱ्या अर्थाने जात आहे ‘असे तहसीलदार गणेश माळी म्हणाले .

या कार्यक्रमात बोलताना प्रा. मधुकर राळेभात यांनी “रमजान हा फक्त उपवासाचा नव्हे, तर संयम, शांती आणि माणुसकीचा महिना आहे. मुस्लिम बांधव या महिन्यात रोजा ठेवून पुण्य मिळवतात, त्यात आपलाही सहभाग असावा, म्हणून हा छोटा प्रयत्न आहे. प्रत्येक शब्द सत्य, प्रामाणिक आणि नेक असावा, कारण हेच आपल्याला सुख, समृद्धी आणि शांततेकडे घेऊन जाते. माझे गाव, तालुका, जिल्हा आणि देश शांत असला पाहिजे, हीच खरी भावना आहे. रागाला रागाने नाही, तर प्रेमाने जिंका!” असे मत राळेभात यांनी व्यक्त केले.

मक्का मस्जिद (कब्रस्तान) येथे झालेल्या या इफ्तार सोहळ्यास मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष अजहर काझी, तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, नगरसेवक अमित चिंतामणी, उद्योजक आकाश बाफना ; ॲड शमा हाजी कादर ; अझहर काझी ; शेरखान पठाण ;साहित्यिक गोकुळ गायकवाड, मुक्तार सय्यद ; इम्रान कुरेशी ; मंजुरभाई सय्यद ; फरमान भाई शेख ; इस्माईल सय्यद ; गफ्फार सय्यद ; आबेद खान ; हाबीब मास्टर ; तसेच विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी “रमजान हा केवळ धार्मिक उपासना नव्हे, तर समाजाला एकजूट ठेवणारा महिना आहे. रोजामुळे मनाची आणि शरीराची शुद्धता होते. समाजात शांतता राखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. सोशल मीडियाचा चुकीचा वापर टाळावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.” असे आवाहन केले.

नगरसेवक अमित चिंतामणी यांनी प्रा. मधुकर राळेभात यांच्या कार्याचा गौरव करत “ते केवळ राजकीय नेता नाहीत, तर हिंदू-मुस्लीम ऐक्याचे खरे प्रतीक आहेत. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.” असे मत चिंतामणी यांनी व्यक्त केले.
यावेळी अझहर काझी यांनीही प्रा. राळेभात यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत “ते प्रत्येक सणात सहभागी होतात. त्यांच्या कार्यातून सलोख्याचा प्रकाश पसरत आहे.” . गेल्या अनेक वर्षापासून न चुकता प्रा . मधुकर आबा राळेभात मित्र मंडळ हे सातत्याने इफ्तार पार्टीचे आयोजन करित असुन कधीतरी तरी त्यांची परत फेड करून राळेभात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु अशा द्रुढ विश्वासअझहर काझी यांनी व्यक्त केला .

या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या इफ्तार पार्टीमध्ये प्रा. मधुकर राळेभात मित्र मंडळाच्या वतीने पवन राळेभात, सुरज राळेभात, अमित जाधव, अवधुत पवार, बिलाल बागवान, ॲड हर्षल डोके, ॲड ऋषी डुचे, पिंटू बोरा, मोहन पवार, नागअर्जुन राळेभात यांचे हस्ते फलाहराचे वाटप करण्यात आले. सर्व उपस्थितांना अल्पोहार वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जाकीर शेख यांनी केले तर आभार पवन राळेभात यांनी मानले. मौलाना खलील अहमद यांनी प्रार्थना करून सदर इफ्तारीचा कार्यक्रम संपन्न केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here