साकतमध्ये हभप सचिन महाराज जपकर यांनी दुसऱ्या दिवशी किर्तन सेवा संपन्न
सत्तर वर्षे अखंड वीनावादन निमित्ताने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह
प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास सोमवार दि २४ रोजी सुरू होत आहे. यात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच तुकाराम महाराज चरित्र, काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा भजन, हरिपाठ, किर्तन व नंतर गावजेवण व हरिजागर असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. सप्ताहाची सांगता सोमवार ३१ रोजी होणार आहे. आज मंगळवारदि २५ रोजी हभप सचिन महाराज जपकर ज्ञानाई अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था अहिल्यानगर यांनी दुसऱ्या दिवसाच्या किर्तन सेवेसाठी पुढील अभंग निवडला होता.
हरी प्राप्तीशी उपाय ! धरावे संतांचे ते पाय !!
तेणे साधती साधने ! तुटती भवाची बंधने !!
संतावीण प्राप्ति नाही ! वेद शास्त्र देती ग्वाही !!
एका जनार्दनी संत ! पुर्ण करीती मनोरथ !!
श्री संत एकनाथ महाराज
हरी प्राप्तीसी उपाय” अभंगाचा अर्थ असा आहे की, भगवंताची (हरी) प्राप्ति साधण्यासाठी, संतांच्या चरणी (पाय) जावे, त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करावे, कारण तेच साधनेचे साधन आहेत आणि तेच भवबंधनांना तोडतात.
जामखेड तालुक्यातील साकत येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. २४ पासून सुरू होत आहे व सोमवार दि. ३१ रोजी सांगता होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सप्ताहातील दैनिक कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ विष्णू सहस्रनाम, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन, दुपारी ३.३० ते ५ पर्यंत तुकाराम चरित्र, ५.३० ते ६.३० हरिपाठ, रात्री ७ ते ९ किर्तन व नंतर गावजेवण
पुढीलप्रमाणे मान्यवर कीर्तनकारांची किर्तनसेवा होईल सायंकाळी ७ ते ९ दररोज पुढील किर्तन कारांच्या किर्तन सेवा होणार आहेत. उद्या बुधवार दि. २६ रोजी हभप वर्षाताई महाराज काळे भागवताचार्य बीड, गुरूवार दि. २७ रोजी हभप पुंडलिक महाराज नागवडे न्हावरा शुक्रवार दि. २८ रोजी हभप दत्ता महाराज हुके भागवताचार्य साकत ता. परांडा शनिवार दि. २९ हभप राजेंद्र महाराज सावंत छत्रपती संभाजी महाराज चरित्र रविवार दि. ३० रोजी हभप गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ सोमवार दि ३१ रोजी सकाळी ९ ते १२ हभप गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे काल्याचे किर्तन होईल. अशी माहिती संयोजक हभप भीमराव महाराज मुरूमकर व हभप बाबा महाराज मुरूमकर यांनी दिली.
गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, हभप माऊली महाराज कोल्हे, काका महाराज निगुडे, पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, गहिनीनाथ सकुंडे, अशोक महाराज सपकाळ व गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज फडावरील गायक मंडळी हजर राहतील. मृदुंगाचार्य हभप भारत महाराज कोकाटे, अमोल महाराज चाकरवाडी, बाजीराव महाराज वराट, उत्रेश्वर महाराज वराट, शंकर महाराज माळी, रोहन गवळी, रोहित गवळी दिपक अडसूळ, विक्रम महाराज खुळे, सुनील भालेराव, श्रीराम भालेराव, महादेव गवळी, चोपदार आश्रू सरोदे, आजीनाथ पुलवळे असतील.
सप्ताहासाठी मंडप सौजन्य अनिल साहेबराव वराट इंदोर मध्यप्रदेश यांचे राहिल, फोटो ग्राफर ओम दळवी तसेच जाहिरात सौजन्य कै. ओम अशोक वराट यांच्या स्मरणार्थ अशोक कुंडलीक वराट असतील