जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष आवश्यक – डॉ. संजय भोरे
सनराईज् शैक्षणिक संकुलामध्ये दहावी बॅच २००४/२००५ चे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्ष करावा लागेल. संघर्षावर प्रेम केले तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. यश मिळविण्यासाठी नियमित अभ्यास करणे म्हणजे संघर्ष आहे. दुःख व संघर्षातील फरक ओळखा.’’ असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजयजी भोरे यांनी केले.
दिनांक २३ मार्च रविवार रोजी जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज मेडिकल अँड एज्युकेशन फौडेशन संस्थेचे साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालयात सन २००४/२००५ दहावी ची बॅच चा गेट-टुगेदर कार्यक्रम संपन्न झाला.
सनराईज् मेडिकल & एज्युकेशन फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजयजी भोरे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून हनुमान विद्यालय दिघोळ चे सहशिक्षक जाकीर शेख हे उपस्थित होते, व तसेच साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व स्व.एम.ई भोरे जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती अस्मिता जोगदंड/भोरे मॅडम, संचालक प्रा तेजस दादा भोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार, दीप प्रज्वलन करून अभिवादन केले. साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय सन २००४/२००५ चे माजी मुख्याध्यापक कै. शरद वराट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
विद्यार्थ्यांनी, परिपाठ, राष्ट्रगीत व आपल्या लाडक्या शिक्षकांचे व मान्यवरांचे सत्कार केले या वेळी योगेश पवार, अश्विनी डुचे, सलीम सय्यद,-रतन ठाकरे, अश्विनी पवार, विनोद पवार, दयानंद शिंदे, अशोक पवार, राणी पवार,अशोक पवार, किरण सांगळे,अश्विनी पवार, योगेश पवार,यांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
चंद्रकांत सातपुते सर विद्यार्थी दशकातील जीवन व पुढे होणारा बदल याचे सविस्तरपणे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जाकीर शेख सर आपल्या विनोदी शैलीतून विद्यार्थ्यांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजयजी भोरे साहेब यांनी असे प्रतिपादन केले की आपल्या जीवनामध्ये यश मिळण्यासाठी संघर्ष करावे लागते. यावेळी त्यांनी आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या या वेळी . किरण पवार, विनोद पवार, संतोष पवार, अनिल ठाकरे, बुवासाहेब दहिकर, किरण सांगळे, विजय वाघ, पिंटू वाटाणे, आबासाहेब सकट, सागर पवार, रतन ठाकरे, राणी पवार या बॅच च्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी जनरेटर भेट दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुनील घाडगे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा प्रदीप भोंडवे सर यांनी मानले. दुपारच्या सत्रामध्ये भोजन व्यवस्था करण्यात आली नंतर चंद्रकांत सातपुते सर, स्वाती पवार मॅडम यांनी तास घेऊन जुन्या आठवणीना उजाळा दिला , तसेच संगीत खुर्चीचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला शेवटी सर्वांनी चहाचा आस्वाद घेऊन आनंदात उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.
रतन ठाकरे,रोहिणी पवार, वर्षा पवार, राणी पवार अश्विनी डुचे, योगेश पवार. विनोद पवार. सलीम सय्यद. किरण सांगळे. अनिल ठाकरे,विजय वाघ, पिंटू वटाने, किरण पवार, अरविंद पवार, लक्ष्मण खैरे, आबा सकट, अशोक पवार, बुवासाहेब दहिकर, दयानंद शिंदे,संतोष पवार, तुळशीराम वटाने हे माझी विध्यार्थी उपस्थित होते.