कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस सक्षम – पोलीस निरीक्षक महेश पाटील
आगामी रामनवमी, रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्त शांततेत व सुव्यवस्थेत होण्यासाठी जामखेड पोलीस, दंगा काबू योजनेचेशहरात संचलन करण्यात आले. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, परिसरात कोठेही दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास दंगा काबू पथक, फायर ब्रिगेड, अँब्युलन्स लवकरात लवकर हजर होऊन दंगल आटोक्यात आणण्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध केले. नागरिकांच्या जीविताचे, मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलीस सक्षम असल्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.
आगामी होणा-या सण उत्सव तसेच अनुषंगाने दंगा काबू योजना मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत यांच्या मार्गदर्नाखाली रंगीत तालीम घेण्यात आली. व दंगा काबू पथक नेहमी तयार असल्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
सदर प्रात्यक्षिक करते वेळी उद्भवलेल्या प्रसंगाला सामोरे जाणेसाठी 3 पोलीस 2 अधिकारी व 5 पोलीस अंमलदार तात्काळ उपलब्ध झाले होते.
त्यांनतर जामखेड पो.स्टे.चे 15 पोलीस अंमलदार तसेच नायब तहसीलदार काळे साहेब, फायरब्रिगेड गाडी व अँब्युलन्स गाडी हे 30 मिनीटात घटनास्थळी दाखल झाले होते.
यावरून एखादी घटना घडली तर पोलीस बळ लवकरात लवकर उपलब्ध होणे गरजेचे असल्याने तसेच इतर अधिकारी व मदत ही लवकरात लवकर पोहोचली यावरून दंगा काबु योजना राबविताना येणा-या अडचणी लक्षात घेता जास्त् पोलीस मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे.
दंगा काबु योजना संपल्यानंतर जामखेड शहरात रूट मार्च घेण्यात आला आहे., यावरून दंगा काबु योजना साठी सर्वांचा प्रतिसाद मिळाला. यावेळीपोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा चौक येथे संपन्न करण्यात आले.