जामखेड आगारासाठी दोन नव्या बस, शहरवासीयांच्या वतीने स्वागत
गेल्या अनेक दिवसांपासून जामखेड तालुक्यातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी संघटना यांच्या वतीने बसची मागणी करण्यात येत होती. आज दोन बस जामखेड आगारास प्राप्त झाल्या. यावेळी चालकांचा सत्कार व बसचे पूजन शहरवासीयांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, ग्रामीण प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष गुंदेचा, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, भाजपा नेते संजय काशिद,भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष गणेश काळे, गणेश लटके, बाजीराव गोपाळचरे, बाळू शेठ गवळी, सागर गुंदेचा, सुरेश जाधव,
बस आगारातील हंगामी आगार व्यवस्थापक शशी खटावकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक नितीन दाणी, गणेश मासाळ, योगेश पोकळे, सुनील वारे, अनिल सदाफुले, चालक बाळासाहेब लोंढे व नितीन काशिद, बाळासाहेब कुर्लेकर, बाबू काळदाते यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आज दोन नव्या बस उपलब्ध झाल्या तसेच लवकरच आठ गाड्या येतील असे सांगितले जात आहे. सध्या बस आगारातील बसची अवस्था खुपच दैनीय झालेली होती. यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते व नेते यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अनेक तालुक्याला बस मिळाल्या होत्या पण जामखेड मागे राहिले होते. आता जामखेड ला पण बस मिळायला सुरुवात झाली आहे.
पुणे दापोडी येथून सकाळी जामखेड साठी दोन बस घेऊन आले सायंकाळी पाच वाजता जामखेड येथे पोहचल्या यावेळी ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
चौकट बस मागणी वरून श्रेयवाद रंगला भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, प्रवासी संघटना यांच्या मध्ये आम्हीच बसची मागणी केली असे सांगितले जात होते. यामुळे बसचे स्वागत करतानाही श्रेयवाद दिसून आला.
चौकट सुरूवातीला भाजपा व प्रवासी संघटना यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने स्वागत करण्यात आले स्वतंत्र पणे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.