जामखेड बस आगाराच्या गलथान कारभारामुळे भर उन्हात विद्यार्थ्यांची पायपीट
जामखेड तालुक्यातील साकत येथे पिंपळवाडी व कडभनवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी जामखेड आगाराची बस आहे. पंरतु कधी कधी जामखेड आगारातील अधिकारी कर्मचारी यांच्या समन्वयाअभावी विद्यार्थ्यांना भर उन्हात पायपीट करावी लागते. याचा मोठा मानसिक त्रास विद्यार्थ्यांना होत आहे. भर उन्हात चार पाच किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागते.
श्री साकेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जामखेड आगाराची बस पिंपळवाडी व कडभनवाडी साठी असते आज शनिवारी बारा वाजता शाळा सुटली सव्वा बारा वाजता बस साठी जामखेड आगारात शशी खटावकर यांना फोन केला असता ते म्हणाले बस पाठवली आहे. सव्वा एक वाजली तरी बस येत नाही म्हटल्यावर परत फोन केला तर ते म्हणाले दाणी नितीन यांना फोन करा दाणी यांना फोन केला तर ते म्हणाले की, बस शिल्लक नाही.
गाड्या पैठण येथे गुंतल्या आहेत. एक अधिकारी म्हणतात बस सुटली दुसरे एक तासानी म्हणतात बस उपलब्ध नाही या अधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे विद्यार्थी दीड ते दोन वाजेपर्यंत साकत येथे बसची वाट पाहत होते. नंतर गाडी येणार नाही म्हटल्यावर खाजगी वाहन पाहिले पण तेही मिळाले नाही यामुळे सुमारे तीस चाळीस मुलींना भर उन्हात पाच किलोमीटर पायपीट करावी लागली.
जामखेड आगारातील अधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खोटे बोलणाऱ्या व माहिती न घेता उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांवर बस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी पालकांनी मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बससेवा नसल्यानं अडचणी येतात.
वेळेत घरी पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतून एक तास आधी बाहेर पडाव लागत. एवढंच नाही तर, बस आली नाही तर त्यांना घरी जाण्यासाठी पाच किलोमीटर पायपीट करावी लागते. अशा प्रवासामुळं त्यांना धोका निर्माण होऊ शकतो.