जामखेड परिसरात नशायुक्त पानाची क्रेझ, तरूणांचा पानटपरी भोवती गराडा
मावा गुटखा नंतर पान टपऱ्याची मोठी संख्या
जामखेड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात काही पान टपऱ्यांवर दिवसातील ठराविक वेळेला तरुणांची गर्दी जमलेली असते. गुटखा बंदीनंतर माव्या कडे वळलेले तरुण आता पानासाठी ही गर्दी करू लागले आहेत. पानातील विशिष्ट घटकांमुळे नशेची सवय लागल्याने त्या-त्या वेळेला हे तरुण पानटपरीला गराडा घालून उभे असल्याचे चित्र दिसते. ही बाब चिंताजनक असून, याकडे पोलिस वप्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. सध्या नवनवीन पद्धतीची पानपट्टी दुकाने थाटली जात आहेत. कोणत्याही भागात असलेल्या या टपऱ्यांवरतरुणाईची गर्दी जमते. पान टपऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.
दिवसभरात सहा ते आठ वेळा असे ठराविक पद्धतीचे, विशिष्ट पान खाणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये नेमका कोणता घटक असतो? त्यातून ही सवय जडते, याचा तपास होणे आवश्यक आहे. पूर्वीपासून नागवेलचे पान घेऊन त्याला थोडा चुना, सुपारी आणि कात घालून खाण्याची पद्धत होती.
त्यासोबतच पत्ती घालून पान खाणारे व्यसनी ठरू लागले कालांतराने त्यात वाढ होत रिमझिम पान आले. आता त्यापुढील प्रकार बाजारात आल्याची चर्चा आहे. नियमित गुटखा खाणाऱ्यांना तंबाखू आणि सुगंधी सुपारी अशा दोन स्वतंत्र पुड्या घेऊन त्या एकत्र करून खाल्ल्या जातात. विशेषतः तरुणांमध्ये वाढती नशेची प्रवृत्ती आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता.
पानांमध्ये नशायुक्त पदार्थांचा वापर
पान टपरीवर विकल्या जाणाऱ्या पानांमध्ये नशायुक्त पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. काही प्रकारच्या पानांमध्ये तंबाखू, मावा,सुगंधी किमाम, इतर नशा युक्त पदार्थांचा समावेश असतो. ज्या मुळे नशेची सवय लागू शकते. तथापि,पानामध्ये तंबाखू किंवा इतर नशा युक्त पदार्थांचा वापर आरोग्यास हानिकारक ठरू शकतो.
फुलचंद पान
हे पान त्याच्या खास मसाल्यां साठीओळखले जाते. पान तयार करताना चुना, कात, नवतरन किमाम, मीनाक्षी चटणी, काळी सल्ली, रिमझिम पावडर,सुपारी, इलायची किंवा लवंग यांचा समावेश होतो. हे पान खाल्ल्यावर तोंडात सुगंध आणि चव येते, असे पान खाणाऱ्याने सांगितले. रिमझिम पानाची तरुणांमध्ये क्रेझ वाढत चालली आहे.
रिमझिम पानाची तरुणांमध्ये विशेष क्रेझ
कोल्हापूर पासून मुंबई,पुण्यापर्यंत या पानाची चर्चा आहे. रिमझिम पान तयार करताना विशेष प्रकारचे मसाले आणि घटक वापरले जातात. ज्यामुळे त्याची चव आणि सुगंध विशेष बनतो. पान खाणे हा अनेकांसाठी आनंदाचा आणि शौकाचा भाग आहे.
चौकट
नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात, त्यामुळे तोंडाची चव वाढते. पान खाल्ल्याने तोंडातील अनेक जीवाणूंचा प्रभावीपणे सामना केला जातो ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही. तसेच दात पोकळी, दात किडणे यांचा त्रास कमी होतो. जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात. आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही फायदेशीर ठरते. पण आता अनेक नशायुक्त पदार्थ टाकून पान खाल्ले जाते यामुळे नशा येते. सध्या यामुळे पानटपरींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.