जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे जोमात सुरू झालेले काम कोमात खोदलेला रस्ता, रस्त्यावरील मुरूम व खडीचे ढिगारे आणि बंद काम यामुळे व्यापारी व नागरिक हैराण
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे जोमात सुरू झालेले काम कोमात
खोदलेला रस्ता, रस्त्यावरील मुरूम व खडीचे ढिगारे आणि बंद काम यामुळे व्यापारी व नागरिक हैराण
अनेक दिवसांपासून रखडलेला जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे बीड काँर्नर ते विश्वक्रांती चौक रस्ता सुरू झाला होता. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, व्यापारी, पत्रकार, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत नुकतीच सभा संपन्न झाली यात अतिक्रमणे काढण्यात येणार याबाबत एकमत झाले. रस्ता काम शहरातून असल्याने चांगली यंत्रणा कामाला लागली राॅयल्टी थकलेली असल्यामुळे तहसील कार्यालयाने राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करत टिपर व इतर वाहने सील केली आहेत. यामुळे जोमात सुरू झालेले काम पुन्हा कोमात गेले आहे.
काम सुरू झाले रस्ता खोदला मुरूम खडी टाकली पण राॅयल्टी थकल्याने महसूल विभागाने काम बंद केले. नेमका शहरातील रस्ता अनेक ठिकाणी खोदलेला, काही ठिकाणी मुरूम खडी ढिगारे, एकेरी वाहतूक व्यापाऱ्यांच्या दारात खडी व मुरूम ढिगारे, खोदलेला रस्ता यामुळे सगळीकडे धुळ यामुळे शहरातील बीड रोडवरील व्यापारी वर्ग तसेच नागरिक हैराण झाले आहेत. आम्ही दुकाने कशी चालवायची असा प्रश्न केला आहे. ठेकेदारांने राॅयल्टी का भरलेली नाही, नेमके महसूल विभागाला शहरात अडचणीच्या ठिकाणी काम असताना राॅयल्टीचे सूचले का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाकडे एकुण 72 लाख रुपयांची राॅयल्टी होत आहे यापैकी 31 लाख रुपये भरलेले आहेत. बाकी शिल्लक आहेत. चार दिवसांपूर्वीच भरतो म्हटलेल्या ठेकेदारांने का भरलेली नाही शहरवासीयांना व व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे.
शहरातील रस्ता असल्याने लवकर होणे अपेक्षित आहे बीड काँर्नर ते विश्वक्रांती चौक पर्यंत रस्ता खोदून ठेवलेला आहे. वाहतूक एका बाजूने वळवून एका बाजूला मुरूम व खडी टाकली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच रस्ता खोदलेला असल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे रस्ता लगतचे व्यापारी व नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अडिच वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अठरा महिन्याची मुदत असताना अडीच वर्षे झाले तरी पंचवीस टक्के काम झाले नाही. आगोदर विधानसभा निवडणुकीमुळे लोकप्रतिनिधी गप्प राहिले आता परत नगरपरिषद निवडणूक होणार म्हणून परत लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प आहेत. एरवी विकास कामाच्या बाबतीत श्रेयवाद उफाळून येतो मीच आणले म्हणून प्रेसनोट येतात. यामुळे वेळेत नियमानुसार रस्ता होण्यासाठी, विधानपरिषदेचे सभापती, खासदार, आमदार यांनीगप्प दिसत आहेत.
जिल्ह्यातील इतर तालुक्याचे अतिक्रमणे निघाली पण जामखेड शहरातील अतिक्रमणे निघत नाहीत नेमकी काय अडचण आहे असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे. जामखेड शहरातील जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाल्याने गोरगरीबांची दुकाने व टपर्या पुर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत.
मात्र बीड रोडवरील धनदांडग्यांचे अतिक्रमण न काढताच व रस्ता रुंदीकरण न करताच रस्त्याचे काम सुरू केले आहे. गरीब टपरी धारकांनी आपले अतिक्रमण काढून घेतले मात्र प्रशासनाने बीडरोडवरील ‘त्या’ दुकानांच्या अतिक्रमला पाठींबा दिला का ? असा सवाल उपस्थित होत आहे त्यामुळे सामान्यकडून प्रशासनाच्या चलढकलपणा भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. जास्त टिका झाल्यानंतर काल महामार्ग पदाधिकारी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, व्यापारी, नागरिक, पत्रकार यांच्या समवेत बैठक होऊन आठ दिवसात अतिक्रमण काढण्यावर एकमत होणार होते. नेमके गुरूवार पासून काम बंद आहे.
चौकट
गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी जिथे कायम गर्दी असते अशा ठिकाणी प्रशासनाने काम बंद पाडले आहे…. त्यामुळे लोकांचा तसेच बीड रोडवरील रहिवाशी यांचा खोळंबा होत आहे.. सगळ्या रस्त्यावर खडीचे व मुरूमाचे ढिगारे पडल्यामुळे दुकानदारांना त्रास होत आहे. दारातच ढिगारे आहेत. ठेकेदारांने रॉयल्टी का भरलेली नाही, महसूल विभागाने आताच का काम बंद पाडले याचा शहरवासीयांना व व्यापाऱ्यांना नाहक त्रास होत आहे.