नवीन शैक्षणिक धोरण आनंदाने स्वीकारावे – संजय वराट जामखेड येथे शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण २.० मोठ्या उत्साहात संपन्न

0
516

जामखेड न्युज——

नवीन शैक्षणिक धोरण आनंदाने स्वीकारावे – संजय वराट

जामखेड येथे शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण २.० मोठ्या उत्साहात संपन्न

राष्ट्राचे भविष्य हे शिक्षण धोरणावर अवलंबून असते. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाची प्रक्रिया शिक्षणातून उभी राहत असते. राष्ट्रासाठीचे शिक्षण धोरण हे राष्ट्राच्या भविष्यासाठी विकासाचा एक मार्ग असतो. त्यामुळे शिक्षण धोरण आखताना ते भविष्यवेधी असायला हवे. शिक्षण धोरण म्हणजे त्या देशाची भविष्याची विकासाची दिशा असते. भारत सरकारने 21व्या शतकातील पहिले शिक्षण धोरण जाहीर केले आहे ते आनंदाने स्वीकारावे असे आवाहन माजी सभापती व मुख्याध्यापक संजय वराट यांनी केले.

जामखेड येथे शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण २.० शेवटचा टप्पा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक तुषार तागड होते यावेळी जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय वराट, नंदादेवी विद्यालयाचे प्राचार्य कळबांडे, मोहा येथील प्रदिपकुमार बांगर चे प्राचार्य आप्पा शिरसाट, मुख्याध्यापक दत्ता काळे, संजय हजारे, विंचरणा पिंपरखेड चे मुख्याध्यापक शंकर खताळ, युवराज भोसले, मोहळकर सर, पोकळे मॅडम, मयुर भोसले, महारनवर सर, घोडके सर सुलभक म्हणून सुभाष बोराटे, हनुमंत वराट, गोपाळ बाबर, राजकुमार थोरवे, कोहक सर, सतिष डुचे, सिद्धू पवार यांच्या सह अनेक मान्यवर शिक्षक उपस्थित होते.


यावेळी बोलताना संजय वराट म्हणाले की, प्रशिक्षण मोठ्या उत्साहात व आनंदायी वातावरणात संपन्न झाले आहे. आपणास नवीन बदल आनंदाने स्वीकारावा लागणार आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. ते सर्व घटकापर्यंत पोहचावयाचे आहे. सध्याच्या युगात तंत्रज्ञानाचा जो वापर होत आहे. याची दखल घेऊन नवीन शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना प्रशिक्षण समन्वयक तुषार तागड म्हणाले की, या प्रशिक्षणात क्षमता, तार्किक बुद्धीमत्ता, मूल्यमापन, हे आपण शिकलो आपले प्रशिक्षण सुलभकाच्या अभ्यासू वृत्ती मुळे सकस झाले. सध्या घोकंपट्टी बंद झाली आहे. क्षमता वृध्दी करावयाची आहे. या टप्प्यात सुमारे १५० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज भोसले व महारनवर सर यांनी केले यावेळी प्राचार्य आप्पा शिरसाट, सुभाष बोराटे, पोकळे मॅडम, मोहळकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


प्रशिक्षण प्रमुख म्हणून तागड तुषार सोमीनाथ विषय तज्ञ गट साधन केंद्र जामखेड
तसेच तज्ञ सुलभक म्हणून वराट हनुमंत रामभाऊ एल. एन विद्यालय जामखेड,
बाबर गोपाल अंकुश नागेश विद्यालय जामखेड, घोडके कालिदास सूर्यकांत पंचक्रोशी विद्यालय नायगाव,
मुजावर अफसर करीम विंचरणा विद्यालय पिंपरखेड,
गाडे दत्तात्रेय हरिभाऊ नंदादेवी विद्यालय नान्नज,
बोराटे सुभाष नामदेव न्यू इंग्लिश स्कूल राजुरी,
यांनी काम पाहिले तसेच प्रशिक्षणात सर्वांनी भरभरून आनंद घेतला प्रशिक्षण अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here