सभापती प्रा राम शिंदे यांच्या मुळेच अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा रद्द – आकाश बाफना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन नवीन प्रारूप विकास आराखडा करू – प्रा. मधुकर राळेभात जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीला यश
सभापती प्रा राम शिंदे यांच्या मुळेच अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा रद्द – आकाश बाफना
स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन नवीन प्रारूप विकास आराखडा करू – प्रा. मधुकर राळेभात
जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीला यश
जामखेड प्रारूप विकास आराखडा हा शहरवासीयांवर अन्याय करणारा होता या अन्यायकारक आराखड्याविरोधात प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली होती या कृती समिती मार्फत धरणे आंदोलन, रास्ता रोको, जामखेड बंद अशी आंदोलने करण्यात आली होती. तसेच जामखेड चे भूमिपुत्र आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मार्फत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत प्रारूप विकास आराखडा अन्यायकारक व चुकीचा आहे हे पटवून दिले होते. त्यांनी सांगितले होते की आराखडा चुकीचा असेल तर रद्द करण्यात येईल असे सांगितले होते त्यानुसार मागील आठवड्यात विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा रद्द केला व नव्याने आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत हे सर्व सभापती प्रा राम शिंदे यांच्या मुळेच झाले असे प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीचे कार्याध्यक्ष आकाश बाफना यांनी सांगितले.
जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यावेळी बोलताना म्हणाले की, प्रारूप विकास आराखडा हा शहर बाधित करणारा होता, बाजारपेठ उद्धवस्त करणारा होता. अनेक एन. ए. इमारती तुटत होत्या, रिंग रोड चारशे मीटर अंतरावर होता. यामुळे अन्यायकारक आराखड्याविरोधात आम्ही १७ तारखेला सभापती प्रा राम शिंदे यांच्या मध्यस्थीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक केली त्यांनी नगररचना अधिकारी यांना बोलावून प्रथम रिंग रोड शहराबाहेरून करू सांगितले. तसेच हा विकास आराखडा अन्यायकारक आहे म्हणून रद्द करून नव्याने करण्याच्या सूचना केल्या. तेव्हा नवीन प्रारूप विकास आराखडा करताना शहराला चांगले स्वरूप येईल असा करू तसेच स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन नवीन प्रारूप विकास आराखडा बनवू असे प्रा. मधुकर राळेभात यांनी सांगितले.
जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, कार्याध्यक्ष आकाश बाफना, उपाध्यक्ष अमित चिंतामणी, सचिव विनायक राऊत, सह सचिव राहुल उगले, खजिनदार अविनाश साळुंके, सदस्य अशोक जावळे, डॉ.संजय राऊत, मोहन पवार हे जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीतील सदस्य आहेत.
जामखेड शहर प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यावर जामखेड शहरातील नागरिकांनी एकत्रित येऊन आराखडा चुकीचा असल्याचे सांगितले होते. तसेच जनजागृती केली होती. ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या नेतृत्वाखाली अन्यायकारक प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात ६०० पेक्षा जास्त हरकती प्राप्त झाल्या होत्या.
जामखेड प्रारूप विकास आराखडा कसा अन्यायकारक आहे हे आम्ही सभापती प्रा राम शिंदे यांच्या लक्षात आणून दिले होते. त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बैठक घेऊन अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा रद्द करून नव्याने आराखडा बनवण्याचे आदेश दिले होते. यामुळे सभापती प्रा राम शिंदे यांच्या मुळेच जामखेड शहरावरील अन्याय रद्द झाला आहे.
नवीन प्रारूप विकास आराखडा बनवताना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन तसेच शहराला चांगले स्वरूप येईल असा तयार करण्यात येईल शहरातील ४५ मीटर रस्ता रद्द करून ३० मीटर ठेवण्यात येईल यावर सर्वाचे एकमत झाले. जामखेड प्रारूप विकास आराखडा हा विकासाचा असेल अहिताचा नसेल.