पाणी मागण्याच्या बाहण्याने वृध्द दांपत्यास पकडून वृध्द महिलेला लुटले, जामखेड तालुक्यातील घटनेमुळे एकच खळबळ
जामखेड तालुक्यातील भुतवडा या ठिकाणी मोटारसायकलवर आलेल्या तीन जणांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने वृध्द महिलेचे तोंड दाबुन दुसर्या चोरट्याने कटरच्या सहाय्याने तीच्या अंगावरील तीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला तीन अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या रात्री सात वाजता घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की दि 17 मार्च रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील भुतवडा येथे तीन अज्ञात चोरटे हे मोटारसायकलवर आले. त्यांनी प्रथम वृध्द महिलेस पाणी मागितले व यानंतर एका चोरट्याने फीर्यादी महिला निलावती मुरलीधर डोके वय 70 वर्षे रा. भुतवडा यांचे तोंड दाबले तर दुसर्या चोरट्याने कटरच्या सहाय्याने फिर्यादी महीलेच्या गळ्यातील तीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले.
यावेळी दागिने लुटून नेत असताना यातील एका चोरट्याने फिर्यादीच्या हाताला चावा घेतला तसेच फिर्यादी व चोरट्यांच्या झालेल्या झटापटीत फिर्यादी यांच्या दोन्ही कानाला जखम झाली आहे. तर एका चोरट्याने फिर्यादी महिलेचे पती मुरलीधर डोके यांना मिठ्ठी मारुन पकडुन ठेवले होते.
सोने चोरुन तीनही अज्ञात चोरटे मोटारसायकल वरुन पळुन गेले. सध्या तीनही आरोपी फरार असुन तीनही चोरट्यांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत. रात्री सर्वजण जागे आसतानाच चोरीचा प्रकार घडला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.