जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे जोमात सुरू झालेले काम पुन्हा बंद
अनेक दिवसांपासून रखडलेला जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे बीड काँर्नर ते विश्वक्रांती चौक रस्ता सुरू झाला होता कालच राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, व्यापारी, पत्रकार, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली यात अतिक्रमणे काढण्यात येणार याबाबत एकमत झाले. रस्ता काम शहरातून असल्याने चांगली यंत्रणा कामाला लागली आज राँयल्टी थकलेली असल्यामुळे तहसील कार्यालयाने राष्ट्रीय महामार्ग काम बंद पाडले, टिपर व इतर वाहने सील केली आहेत. यामुळे जोमात सुरू झालेले काम पुन्हा कोमात गेले आहे.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाकडे एकुण 72 लाख रुपयांची राॅयल्टी होत आहे यापैकी 31 लाख रुपये भरलेले आहेत. बाकी शिल्लक आहेत आज भरतो म्हणून सांगितले होते ते भरलेले नाहीत यामुळे काम बंद केले आहे. असे तहसीलदार गणेश माळी यांनी सांगितले.
शहरातील रस्ता असल्याने लवकर होणे अपेक्षित आहे बीड काँर्नर ते विश्वक्रांती चौक पर्यंत रस्ता उचलून ठेवलेला आहे. वाहतूक एका बाजूने वळवून एका बाजूला मुरूम टाकला जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच रस्ता उकललेला असल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे रस्ता लगतचे व्यापारी व नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अडिच वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अठरा महिन्याची मुदत असताना अडीच वर्षे झाले तरी पंचवीस टक्के काम झाले नाही. आगोदर विधानसभा निवडणुकीमुळे लोकप्रतिनिधी गप्प राहिले आता परत नगरपरिषद निवडणूक होणार म्हणून परत लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प आहेत. एरवी विकास कामाच्या बाबतीत श्रेयवाद उफाळून येतो मीच आणले म्हणून प्रेसनोट येतात. यामुळे वेळेत नियमानुसार रस्ता होण्यासाठी, विधानपरिषदेचे सभापती, खासदार, आमदार यांनीगप्प दिसत आहेत.
जिल्ह्यातील इतर तालुक्याचे अतिक्रमणे निघाली पण जामखेड शहरातील अतिक्रमणे निघत नाहीत नेमकी काय अडचण आहे असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे. जामखेड शहरातील जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाल्याने गोरगरीबांची दुकाने व टपर्या पुर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत. मात्र बीड रोडवरील धनदांडग्यांचे अतिक्रमण न काढताच व रस्ता रुंदीकरण न करताच रस्त्याचे काम सुरू केले आहे. गरीब टपरी धारकांनी आपले अतिक्रमण काढून घेतले मात्र प्रशासनाने बीडरोडवरील ‘त्या’ दुकानांच्या अतिक्रमला पाठींबा दिला का ? असा सवाल उपस्थित होत आहे त्यामुळे सामान्यकडून प्रशासनाच्या चलढकलपणा भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. जास्त टिका झाल्यानंतर काल महामार्ग पदाधिकारी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, व्यापारी, नागरिक, पत्रकार यांच्या समवेत बैठक होऊन आठ दिवसात अतिक्रमण काढण्यावर एकमत होणार होते. नेमके आज काम बंद झाले.
चौकट
सध्या मार्च एण्ड मुळे वसुलीचे काम सुरू आहे काल झालेल्या बैठकीत राॅयल्टी भरा म्हणून सांगितले होते संबंधित ठेकेदाराचा प्रतिनिधी भरतो म्हटला होता पण अद्याप भरलेले नाही. जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाकडे एकुण 72 लाख रुपयांची राॅयल्टी होत आहे यापैकी 31 लाख रुपये भरलेले आहेत. बाकी शिल्लक आहेत आज भरतो म्हणून भरलेले नाहीत यामुळे काम बंद केले आहे.