माझ्यापेक्षा रोहिणी काशिद समाजकार्यात अग्रेसर- संजय काशिद जामखेड महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान तसेच नाट्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
जामखेड महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान तसेच नाट्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
जामखेड परिसरातील महिलांना एकत्रित करून गड किल्ले स्वच्छता मोहीम तसेच दरवर्षी वढू बुद्रुक येथे दीपोत्सव, महिलांच्या आरोग्याविषयी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून जनजागृती केली जाते. तसेच मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे देतात यामुळे रोहिणी काशिद या समाजकार्यात अग्रेसर आहेत असे संजय काशिद यांनी सांगितले.
जामखेडमध्ये महिला आयोजित शिवजन्मोत्सव समिती मार्फत तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. रक्तदान शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य दिव्य मिरवणूक, बाळ शिवाजी पाळणा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, आदर्श माता सन्मान व आज शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संजय काशिद बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी बबन (काका) काशिद होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती रमेश गुगळे, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, बिभीषण धनवडे, राहुल बेदमुथ्था, डॉ. सुशील पन्हाळकर, डॉ. वैभव तांदळे, महेश निमोणकर, भरत जगदाळे, प्रा. सुनील नरके, प्रविण चोरडिया, अल्ताफ शेख, मोहन पवार, मुकुंद सातपुते, एकनाथ चव्हाण, ज्ञानेश्वर कुलथे, निलेश तवटे, आण्णासाहेब काशिद, सुरज काळे, पप्पू काशिद, बबलू टेकाळे, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, अजय अवसरे, धनराज पवार, संतोष शिंदे, संतोष भोंडवे, बिभीषण धनवडे, फाटे साहेब, डॉ. विकी दळवी, श्याम पंडित, उद्धव हुलगुंडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आदर्श माता
महिला शिवजन्मोत्सव समिती च्या आयोजक रोहिणी काशिद, कोमल धनवडे आदर्श माता भामाबाई शिंदे व सदाबाई गुगळे
जामखेड भुषण
हभप कैलास महाराज भोरे,
जामखेड गौरव
प्रा. सुनील नरके, कै. सुरेश कुलथे,
जामखेड रत्न
डॉ. शिवानी विष्णू पन्हाळकर, मयुर भोसले
सर्पमित्र श्याम पंडित, शैक्षणिक रत्न मीना राळेभात याच बरोबर क्रीडा क्षेत्रात विविध पातळीवर नैपुण्य मिळवलेल्या २७ खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रसिद्ध उद्योगपती रमेश गुगळे म्हणाले की, आजच्या सत्कारमुर्ती आदर्श माता या आधुनिक जिजाऊ, झाशीची राणी, अहिल्यादेवी होळकरच आहेत. कठीण परिस्थितीतून आपल्या मुलांना घडविले आहे. जसे शिवरायांनी सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्रित करून स्वराज्य स्थापन केले तसेच सर्वाना एकत्रित करून आदर्श समाजकार्य संजय काशिद मित्रमंडळ करत आहे.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना बबन काका काशिद यांनी सांगितले की, जामखेड परिसरातील नागरिकांसाठी संजय काशिद व रोहिणीताई काशिद एक आगळीवेगळी मेजवानी देत आहेत. खुपच छान कार्यक्रम आहे. महिला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा अविस्मरणीय आहे.
नाट्यस्पर्धेचा निकाल
महीला शिवजन्मोत्सव सोहळा, 2025 जामखेड सांस्कृतिक स्पर्धा.
1) मोठा गट- प्रथम क्रमांक – लिटल स्टार इंग्लिश स्कूल, खर्डा (नाटक छावा)
2) मोठा गट- द्वितीय क्रमांक – स्वराज्य कन्या – गौरी जंगम, (नाटक – पावनखिंड)
3) मोठा गट – तृतीय क्रमांक-तांडव ग्रृप, (तांडव नृत्य)
उत्तेजनार्थ – शिवगर्जना ग्रृप, देवाचा गोंधळ गीत ———————————————–
लहान गट- प्रथम क्रमांक – एकलव्य स्कूल, (एकच राजा)
लहान गट- द्वितीय क्रमांक – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव गल्ली, (दैवत छत्रपती)
लहान गट – तृतीय क्रमांक – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खुरदैठण (आम्ही शिवकन्या)