जामखेड प्रशासकीय विभागात शेकडो पदे रिक्त,एकीकडे बेकारी तर दुसरीकडे शेकडो पदे रिक्त
आज वाचा पंचायत कार्यालयात किती व कोणते पदे आहेत रिक्त
पंचायत समिती ही ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या मध्ये दुवा म्हणून काम करते. तालुक्यातील प्रशासन विभागात येणाऱ्या शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभाग, बांधकाम विभाग व गावचा गाडा हाकणारी ग्रामपंचाय विभागाचे प्रमुख कारभार तालुका पंचायत समित्यांमधून चालते. पण जामखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण, आरोग्य, पशुवैद्यकीय, बांधकाम आणि ग्रामपंचायत प्रशासनातील रिक्त पदांमुळे तालुक्यातील प्रशासकीय विभाग दुबळा झाल्याचे वास्तव आहे. विविध विभागावातील १२६ पदे रिक्त आहे. याबाबत विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, खासदार निलेश लंके व आमदार रोहित पवार यांचे राज्याच्या राजकरण्यात वजनदार नेते म्हणून ओळखले जातात त्याच्याच मतदारसंघात महत्वाच्या असणाऱ्या पंचायत समितीच्या एकुण 13 विभागात मोठ्या प्रमाणावर जाग रिक्त असून दोन्ही नेत्यांनी आपले वजन वापरून किमान रिक्त जागा भरून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान चालू वर्ष निवडणुकांचे वर्ष असणार आहे. लोकसभा त्यापाठोपाठ विधानसभा, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे वर्ष जाणार आहे. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यरत त्या त्या विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण जाणवणार आहे.
शिक्षण, आरोग्य व ग्रामपंचायत विभागात अपुरे कर्मचारी-तालुक्यातील शिक्षण विभागात ५३ जागा अपुऱ्या आहेत. त्यापाठोपाठ आरोग्य विभागातील ९ आणि ग्रामपंचायती मधील १५ जागा रिक्त आहेत. महत्वाच्या असणाऱ्या कृषी अधिकारी, पशुधन विकास अधिकारी विस्तार, बालविकास प्रकल्प अधिकरी, अंगणवाडी सेविका ,जलसंधारण अधिकारी, उपअभियंता, गटशिक्षणाधिकारी या पदावरील जागा रिक्त असून शिवाय तालुका पंचायत समिती मधील महत्वाच्या २० जागा रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सेवा देताना हेळसांड होताना दिसत आहे.
रिक्त जागांची वाळवी व ८७ गावच्या व ५८ ग्रामपंचायतीच्या प्रशासन व्यवस्थेचा बोजा वाहणाऱ्या तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाला रिक्त पदांची वाळवी लागली आहे. त्यातच अतिरिक्त कामाचा ताण, वैयक्तिक कामे, आरोग्य विषयक तक्रारी यांचे कारण पुढे करून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या रजेमुळेही प्रशासकीय विभागातील कार्यालये व कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या शोभेच्या बाहुल्या बनून उभ्या असतात. याचा नाहक त्रास नागरिकांना सेवा प्रदान करताना होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच प्रशासकीय विभागातील रिक्त पदे भरली जावीत अशी मागणी नागरीक करत आहेत.
रिक्त जागा – पंचायत समिती विभाग कृषी अधिकारी -१ कनिष्ठ प्रशासन अधिकारी १ वरिष्ठ सहाय्य्क लिपिक -१ कनिष्ठ सहायक – २ ग्रामपंचायत अधिकारी -१५
आरोग्य विभाग औषध निर्माण अधिकारी १ कनिष्ठ सहायक -१ आरोग्य सहाय्यीका -२ आरोग्य सेवक – ३ आरोग्य सेविका -२
पशुवैद्यकि विभाग पशूधन विकास अधिकारी विस्तार – १ पशुधन विकास अधिकारी खर्डा -१ सहाय्यक पशुधन अधिकारी -१
,,,,,,,,,शिक्षण विभाग,,,,,,,,,,
गटशिक्षणाधिकारी – १ शालेय पोषण आहार अधीक्षक -१ विस्तार अधिकारी शिक्षण -२ वरिष्ठ सहायक लिपिक -२ केंद्रप्रमुख – ५ मुख्याद्यापक -३ पदवीधर शिक्षक -५ प्राथमिक शिक्षक – २४
,,,,,,,,,जि प लपा /बांधकाम विभाग,,,,,,,,,,,, – जलसंधारण अधिकारी -२ स्थापत्य सहायक -१ अनुरेखक -१ वरिष्ठ सहायक लिपिक -१
,,,,,,,,,,,,ग्रापापु विभाग ,,,,,,,,,,,, उपअभियंता – १ शाखा आभियंता -४ वरिष्ठ सहायक – १
,,,,,,,,,एकात्मिक बाल विकास अधिकारी प्रकल्प ,,,,,,,,,,,,, बालविकास विकास प्रकल्प अधिकारी -१ पर्यवेक्षिका -२ वरिष्ठ सहायक लेखा -१ कनिष्ठ सहायक लिपिक – १ अंगणवाडी सेविका – ३ अंगणवाडी मदतनीस ३२
अशा एकुण पंचायत समिती विभागात १२१४ जागांपैकी १०८९ जागा भरलेल्या आहेत तर १२६ जागा रिक्त आहेत.
काल आपण तहसील कार्यालयातील २७ रिक्त जागाबाबत माहिती पाहिली आज पंचायत समिती विभागात एकुण १२६ जागा रिक्त आहेत. एकीकडे मोठ्या प्रमाणात बेकारी तर दुसरीकडे रिक्त जागा अशी विषमता मोठ्या प्रमाणात आहे. लोकप्रतिनिधींनी ताबडतोब जागा भरण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.