मुदत संपूनही रेंगाळलेले काम, कामात धरसोड, अपुर्ण काम, तयार झालेल्या रस्त्यावर मध्ये दुभाजकासाठी सोडलेल्या जागेत मोठ मोठे खड्डे, दिशादर्शक फलक नाहीत, तसेच जागोजागी सिमेंट रस्ता व अपुर्ण कामाच्या ठिकाणी खटक्या यामुळे गाड्या आदळणे व अपघात तसेच अनेक ठिकाणी गटारावरील स्लँब खचलेला यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जामखेड परिसरातील जनता त्रस्त आहे मात्र ठेकेदार सुस्त आहे. त्याला काहीही देणेघेणे नाही.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून अडीच वर्षापासून सुरू आहे अनेक ठिकाणी अर्धवट काम काही ठिकाणी मुरूम तसेच कामावर दिशादर्शक फलक नाहीत, रेडियम नाहीत, काम चालू आहे वाहने साककाश चालवा असे फलक नाहीत.
अनेक ठिकाणी खाचखळगे आहेत यामुळे अनेक अपघात होतात. नुकताच मोठा अपघात होऊन एका पोलीस कर्मचाऱ्यासह एका व्यापाऱ्याचा गाडीने पेट घेतल्याने मृत्यू झालाया आगोदरही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अडीच वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले आहे. अर्धवट काम रेडियम, दिशादर्शक फलक नाहीत यामुळे अपघात होतात तेव्हा संबंधित कंपनी व ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा 3 मार्च पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. यावेळी काकासाहेब गर्जे, नगरसेवक ऋषीकेश बांभरसे, गणेश आजबे उपस्थित होते.
अठरा महिन्यात काम होणे अपेक्षित होते पण अडीच वर्षे झाले तरीही निम्मेपण काम झाले नाही. निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी गटारावरील स्लँब खचलेला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत. सलग काम न करता आधी मधी कुठेही काम केले आहे त्यामुळे सिंमेट रस्ता व कच्चा रस्ता येथे मोठ्या प्रमाणात खटक्या पडलेल्या आहेत यामध्ये गाड्या आदळून पडतात. तसेच रस्ता अपुर्ण ठिकाणी धुळीचा मोठ्या प्रमाणावर त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
शहरातील रस्ता अपुर्ण आहे. धुळीच्या त्रासामुळे पाणी मारले जाते. यामुळे रस्त्यावर मोठ मोठे खाचखळगे झाले आहेत यात गाड्या घसरून अपघात होतात. नियमानुसार कसलेही काम सुरू नाही. जागोजागी फलक नाहीत. काम खुपच रेंगाळलेले आहे. यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त आहे तर ठेकेदार सुस्त आहे.