साकत गाव शिक्षकांचा कारखाना – उपसभापती कैलास वराट श्री साकेश्वर विद्यालयात दहावी सदिच्छा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न

0
783

जामखेड न्युज——

साकत गाव शिक्षकांचा कारखाना – उपसभापती कैलास वराट

श्री साकेश्वर विद्यालयात दहावी सदिच्छा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न

साकत सारख्या ग्रामीण व दुष्काळी भागात ध्येय, चिकाटी व प्रचंड कष्टाने गावात घराघरात शिक्षक आहेत. म्हणून असे म्हणता येईल की साकत शिक्षकांचा कारखाना आहे असे मत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी व्यक्त केले.

श्री साकेश्वर विद्यालयात इयत्ता दहावी सदिच्छा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य श्रीराम मुरूमकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट होते यावेळी, उपसरपंच राजाभाऊ वराट, ज्ञानदेव मुरूमकर, डॉ. सुशील तांबे, अभिषेक पाटील,

मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, जालिंदर घोडेस्वार, आश्रू सरोदे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी तालुक्यात दहावी मार्च 2024 परिक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेला शिवरत्न कैलास वराट, गणित विज्ञान विषयात तालुक्यात प्रथम क्रमांक लक्ष्मी लहू वराट तसेच इयत्ता दहावीतील विद्यार्थी व ज्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दक्षिण आशियायी टेनिस क्रिकेट स्पर्धेत तो एप्रिल महिन्यात नेपाळमध्ये खेळणारा शुभम घोडेस्वार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे तसेच मुलींसाठी खास संदेश दिला की, स्वतः च्या पायावर उभे राहिल्याशिवाय बाहुल्यावर उभे राहू नका असा संदेश दिला तसेच साकत सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतो यात निश्चितच विद्यालयाचा मोठा वाटा आहे.

यावेळी दिक्षा मोरे, प्रज्ञा मुरूमकर प्रियंका डोके, समृद्धी वराट, ऋतुजा वराट, शुभम घोडेस्वार, लक्ष्मी वराट या विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.श्रीराम मुरूमकर, ज्ञानदेव मुरूमकर डॉ. सुशील तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रस्तावित मुख्याध्यापक दत्ता काळे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन रासकर व सुदाम वराट यांनी केले तर आभार राजकुमार थोरवे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here