Monday, March 2, 2026
Home ताज्या बातम्या शंभूराजे कुस्ती संकुल व आमदार रोहित पवार मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त जामखेडमध्ये...

शंभूराजे कुस्ती संकुल व आमदार रोहित पवार मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त जामखेडमध्ये कुस्त्यांची दंगल खासदार निलेश लंके व ओमराजे निंबाळकर आमदार रोहित पवार व सुरेश धस उपस्थित राहणार

0
1498

जामखेड न्युज——

शंभूराजे कुस्ती संकुल व आमदार रोहित पवार मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त जामखेडमध्ये कुस्त्यांची दंगल

खासदार निलेश लंके व ओमराजे निंबाळकर आमदार रोहित पवार व सुरेश धस उपस्थित राहणार

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शंभुराजे कुस्ती संकुल जामखेड व रोहित पवार मित्र मंडळ जामखेड यांच्या वतीने दि बुधवार दि १९ फेब्रुवारी रोजी जामखेड येथे भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शंभूराजे कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश आजबे व चिराग आजबे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी दिल्ली येथील पै. आशिष हुड्डा विरूद्ध पुण्याचा पै. दादा शेळके असा चित्त थरारक कुस्तीचा सामना होणार आहे. या कुस्ती सामन्यांसाठी शिवप्रेमी व कुस्ती शौकीनांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शंभुराजे कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मंगेशदादा आजबे यांनी केले आहे. तसेच मैदानात एकही कुस्ती लावली जाणार नाही. कुस्ती सोडली जाणार नाही, पंचाचा निर्णय अंतिम राहिल. असे जाहीर करण्यात आले आहे.

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व शंभुराजे कुस्ती संकुल व रोहित पवार मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले असुन यावेळी दिल्ली येथील पै. आशिष हुड्डा विरूद्ध पुण्याचा पै. दादा शेळके कुस्तीचा सामना होणार आहे.

याबरोबरच पै. सागर मोहळकर विरुद्ध पै. बंटी शेळके, पै.संदीप लटके विरुद्ध पै. भैय्या शेळके पै.पृथ्वीराज वणवे विरुद्ध पै. साहिल पाटील अशा अनेक दिग्गज पैलवानांच्या कुस्त्या जामखेडकरांना पाहावयास मिळणार आहेत.

भव्य अशा कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शंभुराजे कुस्ती संकुलाचे पै. प्रतीक मुळे विरुद पै. विशाल शिंदे, पै संजय तनपुरे विरुद्ध पै शुभम मगर, पै विकास तावरे विरुद्ध आखिब शेख, पै सौरभ गाडे विरुद्ध पै पप्पू देशमुख, पै उमेश शिंदे विरुद्ध पै गणेश काळे यांच्यासह जवळपास १०० च्यावर पैलवानाच्या कुस्त्या होणार आहेत.

या कार्यक्रमास खासदार निलेश लंके, खासदार ओमराजे निंबाळकर, आ. रोहित पवार, आ सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दि. १९ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक मंगेश कन्स्ट्रक्शन ऑफीस ते नागेश विद्यालय मिरवणुक निघेल दुपारी ३.०० वाजता श्री नागेश विद्यालय जामखेड येथे या स्पर्धा पार पडणार असून स्पर्धेच्या सहभागासाठी पै.बालाजी जरे ८८३०७९३५००, पै.श्रीधर मुळे ७०२०६८१९१०, यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!