श्रुती, स्मृती, कृती हीच यशाची त्रिसूत्री आहे – डॉ. अजयकुमार लोळगे स्वा.सै.कै. मधुकाका देशमुख आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

0
446

जामखेड न्युज——

श्रुती, स्मृती, कृती हीच यशाची त्रिसूत्री आहे – डॉ. अजयकुमार लोळगे

स्वा.सै.कै. मधुकाका देशमुख आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

जीवनात यश मिळवायचे असेल तर काही नित्य नियमाचे पालन करावेच लागते यश मिळवण्यासाठी श्रुती, स्मृती, कृती या त्रिसूत्रीचा वापर केला तर यशस्वी होता येते तसेच स्वत: पासून प्रयोग करा, सुरूवात करा, ध्येय निश्चित करून प्रयत्न करा अंतर्मन स्वच्छ करा, धुळ झटका, ध्येय वेडे व्हा असे आवाहन डॉ. अजयकुमार लोळगे मा. विशेष कार्यकारी अधिकारी बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम मंडळ पुणे यांनी केले.


स्वा.सै.कै. मधुकाका देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटक मा. डॉ. अजयकुमार लोळगे मा. विशेष कार्यकारी अधिकारी बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम मंडळ पुणे यांच्या हस्ते झाले. यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूणकाका चिंतामणी , सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, इंजिनिअरिंग काॅलेजचे प्राचार्य विकी घायतडक, मा. प्राचार्य श्रीकांत होशिंग सह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ अजयकुमार लोळगे म्हणाले की, वक्ता होण्या अगोदर श्रोता होता आले पाहिजे काय ऐकावे, कोणाचे ऐकावे हे महत्त्वाचे आहे यशस्वी, समाधानी व सुखी झाले त्यांच्यात इनपुट आउटपुट चांगले निघते.

आपली शक्तिस्थाने ओळखा, कार्यातून प्रतिमा उंचवा, कमतरता ओळखा, त्रुटी ओळखा
संधी शोधा आव्हाने ओळखा कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे पाहा आगोदर सरस्वती प्रसन्न करून घ्या मग महालक्ष्मी प्रसन्न होणार आहे. असे लोळगे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्धव देशमुख म्हणाले की, वक्तृत्व स्पर्धेचे स्वरूप विस्तारत आहे. तेरा वर्षापुर्वी सुरू केलेली स्पर्धा आज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे.

कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे तर आभार प्रा. अविनाश फलके यांनी केले. परिक्षक म्हणून परिक्षक तनपुरे सर काम पाहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here