आज राज्यात बारावीची परीक्षा सुरू झाली परिक्षार्थी म्हणून दोन महिन्यांपुर्वी निर्घृण हत्या झालेले मस्साजोगचे सरपंच संतोष यांची कन्या वैभवी देशमुख हिचाही आज पहिला पेपर जामखेड मध्ये झाला पेपर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तिने सांगितले की, मी वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. तसेच वडिलांच्या मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून परत कुणाची हत्या होणार नाही.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हीने आज वडिलांचे आशीर्वाद घेतले व परीक्षा केंद्राकडे रवाना झाली होती. आज जामखेड तालुक्यातील परीक्षा केंद्रावर तीने बारावीचा पहिलाच पेपर दिला. परीक्षा देऊन पुढे चांगले शिक्षण घेऊन मी माझ्या वडिलांनी पहिलेले स्वप्न पूर्ण करणार आहे असे देखील तीने सांगितले.
आपल्या वडिलांची हत्या झाल्यानंतर न्याय मिळवण्यासाठी लढा देणारी वैभवी देशमुख हिची देखील आज बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. वडिलांना न्याय मिळवून देण्याची लढाई आणि प्रचंड तणावाच्या वातावरणात दुःख बाजूला सारून वैभवी देशमुखने आपल्या वडिलांचे आशीर्वाद घेत परीक्षा केंद्राकडे रवाना झाली. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे वैभवी देशमुखने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वैभवी देशमुख ही आज दि 11 फेब्रुवारी रोजी सकाळी इयत्ता बारावीचा पहिला पेपर देण्यासाठी जामखेड तालुक्यातील परीक्षा केंद्रावर आली होती. तिचा दुपारी पेपर सुटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तिने सांगितले की माझे वडील माझ्यासोबत नाहीत, असा हा माझा पहिलाच पेपर आहे. मी सध्या नीट ची तयारी करत होते.
मी डॉक्टर व्हावे, असे माझ्या वडिलांना वाटत होते. मात्र, आज ते आमच्यात नाहीत. त्यांना जाऊन आज दोन महिने झाले मात्र घरात पाऊल ठेवले की त्यांची आठवण कायम येत असते. मात्र त्यांनी पाहिलेले स्वप्न मला पूर्ण करायचे असल्याचे वैभवी देशमुखने म्हटले आहे.
आरोपींबाबत बोलताना तिने सांगितले की जे याघटनेतील दोषी असतील त्या आरोपींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे व आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असे देखील तिने सांगितले. अद्यापही एक आरोपी फरार आहे.