विद्याभारती क्लास जामखेडचे वैभव – कॅप्टन लक्ष्मण भोरे अबँकस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व बेस्ट अबॅकस टिचर अवार्ड जाधव मॅडम यांचा माजी सैनिकांच्या हस्ते सन्मान संपन्न
विद्याभारती क्लास जामखेडचे वैभव – कॅप्टन लक्ष्मण भोरे
अबँकस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व बेस्ट अबॅकस टिचर अवार्ड जाधव मॅडम यांचा माजी सैनिकांच्या हस्ते सन्मान संपन्न
विद्याभारती क्लास जामखेडचे वैभव आहे. कारणएनएमएमएस परीक्षेच्या माध्यमातून अनेकांना लाखो रूपयांची शिष्यवृत्ती तसेच अबँकस परीक्षेत घवघवीत यश, कँल्युलेटर पेक्षा जास्त वेगाने गणितीय प्रक्रीया करणारे विद्यार्थी या क्लास मध्ये घडतात. हे याच क्लास मुळे त्यामुळे विद्याभारती क्लास जामखेड चे वैभव आहे असे मत शिवनेरी अकॅडमी चे कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी व्यक्त केले.
सातव्या नॅशनल लेव्हल मेट्रोब्रेन अबँकस परीक्षेत विद्याभारती क्लासच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे वबेस्ट अबॅकस टिचर अवार्ड जाधव मॅडम यांचा माजी सैनिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्रिदल संघटनेचे अध्यक्ष कांतीलाल कवादे, शिवनेरी अकॅडमीचे कॅप्टन लक्ष्मण भोरे, मेजर शहाजी ढेपे, मेजर राजकुमार भराटे, मेजर पोपट सांगळे, मेजर अशोक चव्हाण, मेजर कोठावळे, मेजर पोपट कोरडे, मेजर नितिन गर्जे, पत्रकार सुदाम वराट यांच्या सह अनेक मान्यवर पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना कॅप्टन भोरे म्हणाले की, जामखेड सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येखुप स्टँलेंन्ट आहे. आणि याच स्टँलेंन्ट ला योग्य दिशेने नेण्याचे काम विद्याभारती क्लास करत आहे.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष कांतीलाल कवादे म्हणाले की, आता पर्यंत आम्ही मेट्रो ट्रेन पाहिली होती आज मेट्रो ब्रेन पाहायला मिळाला
सातव्या नॅशनल लेव्हल मेट्रोब्रेन अबँकस परीक्षेतविद्याभारती अबँकस क्लासचे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये टाँपर अवार्ड कृष्णा नानासाहेब माळी याने मिळवला तर Grand Topper award आयान जावेद शेख याने मिळवला.
तसेच z लेव्हल मध्ये आनंदी शामसिंग परदेशी, ओम गौतम सानप A लेव्हल मध्ये मध्ये अकुंर आनंद जाधव, स्वरा शिवाजी हजारे, प्रणव प्रवीण होळकर,अनम अंजुम शेख B लेव्हल मध्ये कृष्णा नानासाहेब माळी व श्रवण किरण जाधव अशा प्रकारे विद्याभारती अबँकस क्लासच्या नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तर बाकी उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना अँचिव्हर ट्राँफी मिळाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. यामध्ये टाँपर अवार्ड कृष्णा नानासाहेब माळी याने मिळवला तर Grand Topper award आयान जावेद शेख याने मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांना विद्याभारती अबँकस क्लासमध्ये जाधव मॅडम मार्गदर्शन करतात. त्यांना बेस्ट टीचर अबॅकस अवार्ड फॉर द इयर 2025 देण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थी व जाधव मॅडम यांचा आज मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लासच्या विद्यार्थीनींनी केले तर आभार जाधव मॅडम यांनी मानले.