सैनिकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच देश सुरक्षित – उद्योजक आकाश बाफना शिवनेरी अकॅडमी येथे आकाश बाफना यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
219

जामखेड न्युज——

सैनिकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच देश सुरक्षित – उद्योजक आकाश बाफना

शिवनेरी अकॅडमी येथे आकाश बाफना यांच्या हस्ते ध्वजारोहण

सैनिकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच आपला देश सुरक्षित आहे. त्यांच्याप्रती प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे. आणि देशसेवक घडविण्याचे काम शिवनेरी अकॅडमी करत. असे मत उद्योजक आकाश बाफना यांनी व्यक्त केले.


जामखेड शहरातील प्रसिद्ध असलेल्या शिवनेरी अकॅडमीत प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्योजक आकाश बाफना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ते बोलत होते.


यावेळी शिवनेरी अकॅडमीचे कॅप्टन लक्ष्मण भोरे,  सैनिक त्रिदल संघटनेचे उपाध्यक्ष कांतीलाल कवादे, आयर्न मँन डॉ. पांडुरंग सानप, नामदेव राळेभात, बापू राख, पिंपळे सर यांच्या सह मोठ्या प्रमाणावर आजी माजी सैनिक, अकॅडमी भरतीपुर्व प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संरक्षण दलात नोकरी करताना देशसेवा, राष्ट्रप्रेम, शिस्तप्रिय जीवन, साहस, धैर्य, कष्ट, अभ्यास, नवीन आव्हाने या गुणांना वाव मिळतो. देशाचे परकीय आक्रमणापासून रक्षण करून देशवासीयांची सुरक्षितता सांभाळणे, देशात शांतता प्रस्थापित करणे, देशाची अंतर्गत सुरक्षा व नागरिकांचे रक्षण करणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संरक्षणदलास सांभाळायच्या असतात. यामुळे आपण सुरक्षित जीवन जगतो. आणि सैनिक घडविण्याचे काम शिवनेरी अकॅडमी करत आहे.


जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा भारत देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्योजक आकाश बाफना यांनी लोकशाही अखंडित व सुरक्षित आहे असे जामखेड पंचक्रोशीतील आजी-माजी ज्येष्ठ सैनिक कॅप्टन सर, कमांडर सर, उपस्थित अकॅडमी मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.


खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला यातूनच देश सेवेसाठी व समाजसेवेसाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली असे आकाश बाफना यांनी सांगितले. तसेच यापुढे सैनिकांसाठी असलेल्या कोणत्याही कार्यक्रमात बाफना कुटुंब हिरिरीने सहभागी होईल असेही सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here