शासकीय चित्रकला परीक्षेत खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालयाची ऐतिहासिक कामगिरी
शासकीय चित्रकला परीक्षेत खर्डा इंग्लिश स्कूल विद्यालयाने ऐतिहासिक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. शंभर टक्के निकाल लागला आहे. मार्गदर्शन करणारे शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षात विद्यालयात शासकीय रेखाकला परीक्षेचे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे. पूर्वी विद्यालयातील तसेच परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी हे तालुक्याच्या ठिकाणी परीक्षेला जात असत परंतु विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याच्या अडचणीचा व जास्त अंतराचा विचार करून विद्यालयातच चित्रकला ग्रेड परीक्षेचे सेंटर विद्यालयातील कलाशिक्षक यांनी प्रयत्न करून सुरू केले आणि पहिल्या प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्यालयातील या परीक्षा सेंटरवर चालू वर्षी 388 विद्यार्थी विविध आठ शाळेंमधून प्रविष्ट झाले. एकूण 375 विद्यार्थी परीक्षेस हजर होते. त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले.
विशेष बाब म्हणजे पहिल्याच वर्षी सेंटरचा निकाल शंभर टक्के लागला तसेच विद्यालयाचा निकालही खूप दैदिप्यमान लागला. विद्यालयाचा निकाल शंभर टक्के. लागला असून एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत 130 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी A ग्रेड 28,B ग्रेड 20, C ग्रेड 82 विद्यार्थी. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत 60 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी A ग्रेड मध्ये 12,B ग्रेड 5, C ग्रेड 43 विद्यार्थी.
या सर्व विद्यार्थ्यांना व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळणारे व गांधी विचार मंच परीक्षेत यश मिळणारे विद्यार्थी यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक कला शिक्षक श्री कोरे रवींद्र,श्री शिरसाट शरद, श्री जाधव विकास क्रीडा शिक्षक श्री. रावसाहेब केंद्रे, श्री. पंढरीनाथ घोडे, गांधी विचार मंच परीक्षेस मार्गदर्शन करणारे श्री. गणेश शिंदे, प्रशांत शेळके यांचे रयत शिक्षण संस्था, जनरल बॉडी सदस्य आ. रोहित दादा पवार तसेच प्राचार्य श्री. सय्यद मुस्तफा, जेष्ठ शिक्षक श्री. तुकाराम विधाते स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा अँड जयश्रीताई नितीन गोलेकर, सदस्य श्री. किशोरसेठ कांकरिया, श्री.अशोक गिते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सचिनसेठ लोळगे व सर्व सदस्य,पालक तसेच परिसरातील ग्रामस्थ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.