विभागीय स्तरावरील शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा बीड येथे संपन्न
बीड जिल्हा क्रीडा संकुल येथे विभागीय टेनिस क्रिकेट शालेय स्पर्धेचे आयोजन टेनिस क्रिकेट असोसिएशन बीड व जिल्हा क्रीडा कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी टेनिस क्रिकेटच्या नॅशनल खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यामध्ये तेजस चोले, शांतनू दूध वडे, आफताब सय्यद व मोहोळकर यांचा समावेश होता.
या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातील संघांनी सहभाग घेतला. छत्रपती संभाजी नगर विभागातील आलेल्या संघाने दिनांक 23 व 24 जानेवारी 2025 रोजी आपले कौशल्य पणाला लावत विजय संपादन केला.
या स्पर्धेचे उद्घाटन माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी विद्याघर सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित खेळाडूंना माननीय थोरात सर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्याघर साहेब, टेनिस क्रिकेटचे जिल्हा सचिव डॉ. सुशील तांबे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रथम सामना अंडर फोर्टीन गटातील ट्वीकलींग स्टार इंग्लिश स्कूल बीड व स्कॉटिश अकॅडमी स्कूल परभणी यांच्यात झाला.
या स्पर्धेतील विजेते संघ खालील प्रमाणे अंडर 14 मुले ट्वीकलिंग स्टार इंग्लिश स्कूल बीड
मुली गुरुकुल इंग्लिश स्कूल बीड अंडर 17
मुले पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बीड मुली इंदिरा गांधी विद्यालय हिंगोली
अंडर 19 मुले परभणी द्वितीय वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा जिल्हा बीड
बक्षीस वितरण गोपाळ धांडे सर, सर्जेराव तात्या तांदळे, थोरात सर, क्रीडा अधिकारी काळे सर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्याघर सर व विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या आयोजनाबद्दल टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष गुजर सर व सचिव मीनाक्षी गिरी मॅडम यांनी मार्गदर्शन केले.