अहिल्यानगरमध्ये मिरजगाव जवळ बर्निग बसचा थरार, पहा व्हिडिओ
अहिल्यानगर-मिरज रस्त्यावर एका धावत्या बसने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. ही बस जवळपास ४० प्रवाशांना घेऊन नाशिक वरून सोलापूरच्या दिशेनं जात होती. या बसच्या बँटरीचा भडका उडाला व बसने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. पण ताबडतोब प्रवाशांना बाहेर काढण्यात आले यामुळे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
अहिल्यानगर-मिरज रस्त्यावर एका धावत्या बसने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. ही बस जवळपास ४० प्रवाशांना घेऊन नाशिक वरून सोलापूरच्या दिशेनं जात होती. दरम्यान, एसटीच्या बॅटरीमधून अचानक धूर निघायला सुरुवात झाली.यानंतर अवघ्या काही क्षणात बॅटरीचा भडका उडाला. या भडक्यात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.
सुदैवाची बाब म्हणजे चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त झालेली बस आज सकाळी सहा वाजता नाशिकवरून सोलापूरच्या दिशेनं निघाली होती.
अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव बसस्थानका पर्यंत येईपर्यंत ही बस सुस्थितीत होती. मात्र मिरजगाव बसस्थानकावरून ही बस निघाल्यानंतर अवघ्या ५००मिटर अंतरावर बसच्या बॅटरीमधून धूर निघत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं.
धूर नेमका कुठून निघतोय, हे पाहण्यासाठी चालकाने रस्त्याच्या कडेला बस थांबवली. खाली उतरून त्यांनी बस तपासली असता, इंजिनच्या बाजुने बसने पेट घेतल्याचं चालकाच्या लक्षात आलं.
यानंतर प्रसंगावधान दाखवत चालक आणि वाहकांनी तातडीने प्रवाशांना खाली उतरवलं. सुदैवाने यादुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.चालकाच्या प्रसंगावधाना मुळे गाडीतून प्रवास करणारे 40 प्रवासी सुखरुप बचावले आहे.
अहिल्यानगर-मिरजगाव रस्त्यावरील बर्निंग बसच्या थराराचे व्हिडीओज समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.