जामखेड न्युज——
खडकत होणार गोवंश कत्तलखाना मुक्त गाव!! जामखेड कधी होणार कत्तलखाना मुक्त
आष्टी तालुक्यातील खडकत येथे मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्त्या व कत्तलखाना होता अनेक तक्रारी दाखल आहेत. तसेच स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. यानुसार गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गावात एकाही गोवंशाची कत्तल होणार नाही असा ठराव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केला आहे.
श्रीगोंदा जामखेड रस्त्यावर असणाऱ्या जामखेड पासून जवळ असलेल्या खडकत गावात मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होत होती. कत्तलखाना पण होता याच्या तक्रारी होत्या.
येथून मांस देशातील वेगवेगळ्या भागात जात होते. मागे काही दिवसांपूर्वी बीड च्या पोलीस अधिक्षकांनी यावर कारवाई केली होती. तरीही चोरून लपून कत्तलखाना व गोवंशाची हत्या सुरूच होती.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या कार्यकर्त्यांनी याबाबत अनेक वेळा गोवंश हत्त्या व कत्तलखाना विरोधात आवाज उठवला होता.निवेदने देत तसेच अधिकारी, पदाधिकारी यांना कत्तलखाना बंद करण्यात यावा म्हणून निवेदने दिले होते.
शिवशंकर स्वामी मानद पशू कल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी यासाठी पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे कारण ग्रामस्थांनी कत्तलखाना बंद करण्याचा व गोवंशाची कत्तल तसेच परिसरात वाहतूक होणार नाही असा ठराव केला आहे.