जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांची जामखेड मध्ये झाडाझडती
अस्वच्छता, दुर्गंधी, अपूर्ण कामे याबाबत विभागप्रमुखांना खडे बोल
जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमाठ यांनी जामखेड येथील सरकारी दवाखाना जुनी व नवी इमारत, नुतन नगरपरिषद इमारत, बसस्थानक परिसरात भेट घेऊन आढावा घेतला. तसेच काही विकासात्मक कामासंदर्भात आराखडा करण्याचे निर्देश दिले. रखडलेले काम व त्रुटी या संदर्भात ठेकेदार व शाखा अभियंता यांना धारेवर धरले तसेच बसस्थानकाचे रखडलेला काम, अस्वच्छता व दोन वर्षे आगारप्रमुखाला झाले पण माहिती देता आली नाही म्हणून चांगलाच समाचार घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा सर्व खात्यांना कृती आराखडा करण्याचे निर्देश दिले. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमाठ यांनी शुक्रवारी जामखेड येथील सरकारी दवाखाना जुनी नवी इमारत, नुतन नगरपरिषद इमारत व बसस्थानकाची फिरून पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी नितीन पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी अजय साळवे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मोराळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार उपस्थित होते.
जामखेड न्युजने मागील आठवड्यात सरकारी दवाखाना व आपला दवाखाना सहा खोल्यात चालतो अशी बातमी लावली होती त्यानुसार त्यांनी या जुन्या इमारतीतील दवाखान्याची पाहणी केली व रूग्णाला जास्तीत जास्त सेवा मिळाल्या पाहिजेत व सुरक्षितता याबाबत अनेक त्रुटी आढळल्या. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शांतीलाल लाड यांना सध्याच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चर आँडीट करा तसेच नियोजीत उपजिल्हा रुग्णालयाचा पहिला मजला सहामहीन्यात झाला पाहिजे. व त्याठिकाणी शासकीय रुग्णालय चालू होईल असे निर्देश ठेकेदार व अधिकारी यांना दिले.
शहरातील हाडकी परिसरात असलेली नगरपरिषद इमारत, वाचनालय, सभागृह याची पाहणी केली. तसेच समोरील असलेली नागेश्वर नदीचे सुशोभीकरण करा, तुळजापूर जगदंबा देवीची पालखी या नदीतून जाते तेथेलोखंडी पुल बसवा याचे अंदाजपत्रक तयार करून नगरोत्थानला सादर करा असे निर्देश नगरपरिषद मुख्याधिकारी अजय साळवे यांना दिले. तसेच सध्याच्या सरकारी दवाखान्यासाठी सहा महिन्याकरीता भाडेकरारावर जागा पहा असे निर्देश दिले.
यानंतर जिल्हाधिकारी सालीमाठ यांनी रखडलेल्या बसस्थानकाची पाहणी केली. बसस्थानक डिझाईन व रखडलेले काम, परिसरातील दुर्दशा व प्रवाशांचे होणारा त्रास पाहून आगारप्रमुख प्रमोद जगताप व ठेकेदाराचा अभियंता यांना चांगलेच झापले. दोन दिवसात स्वच्छता, शौचालय व मुतारीसाठी व्यवस्था करण्याचे आदेश आगारप्रमुखाला दिले.
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास दोन वर्षे झाली तरी काम अपूर्ण आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू. 100 दिवशीय मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी सालीमाठ यांनी घेऊन कामामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.