गोवंशहत्त्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करणार – सभापती प्रा. राम शिंदे जामखेड गोरक्षकांच्या वतीने सभापती प्रा. शिंदे यांचा सत्कार

0
1018

जामखेड न्युज——

गोवंशहत्त्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करणार – सभापती प्रा. राम शिंदे

जामखेड गोरक्षकांच्या वतीने सभापती प्रा. शिंदे यांचा सत्कार

जामखेड परिसरात गोवंशाची चालणारी कत्तल, बेकायदेशीर कत्तलखाने, बाहेरच्या जिल्ह्यात कत्तलीसाठी होणारी वाहतूक, शनिवारच्या आठवडे बाजारात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक याबाबत गोरक्षकांच्या वतीने सभापती प्रा राम शिंदे यांना सांगण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी गोवंशहत्त्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.

जामखेड शहरातील मोठ्या प्रमाणात गोवंशाची चालणारी कत्तल, बेकायदेशीर कत्तलखाने व बाहेरच्या जिल्ह्यात कत्तलीसाठी होणारी वाहतूक तसेच दर शनिवारी शहरात भरत असलेल्या जनावरांच्या बाजारात कशा पद्धतीने शेतकरी बांधवांचे शोषण करुन फसवणूक केली जाते. आणि जनावरे कत्तलीसाठी विकत घेऊन पाठविले जातात.

याबाबत सर्व सविस्तर माहिती त्यांना दिली. व सर्व बेकायदेशीर प्रकार थांबवावेत आणि गोमाफियांवर व त्यांच्या एजंट लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. त्यावेळी सभापती राम शिंदे यांनी आपण सगळं बंद करुन गॊवंशहत्त्याबंदी कायद्याची कडक अंबलबजावणी करू असे अश्वासन दिले.

गोरक्षक पांडुराजे भोसले, कृष्णा सातपुते, आरणगावचे सरपंच लहू शिंदे, अक्षय घागरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवशंकर स्वामी, मानद पशु कल्याण अधिकारी महाराष्ट्र राज्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here