पन्नास वर्षानंतर भेटले शेवटच्या अकरावीच्या बॅचचे मित्रमंडळी, १९७५ च्या अकरावीच्या बॅचचा स्नेहमेळावा
१९७४~७५ या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण घेणार्या व मार्च १९७५ मध्ये जुन्या ११ वी मॅट्रीकची परीक्षा देणार्या शेवटच्या बॅचचा स्नेह मेळावा संपन्न मोठ्या उत्साहात ल. ना. होशिंग विद्यालयात संपन्न झाला.
या स्नेह मेळाव्यासाठी एकुण ३५ मुले व ११ मुली उपस्थित होते. त्यावेळी या विद्यार्थ्यांना इयत्ता ८ वी ते ११ वी पर्यंत शिकविणार्या शिक्षकांपैकी ४ शिक्षक या स्नेहमेळाव्यामध्ये उपस्थित होते.यामध्ये श्री.डि.बी.कुलकर्णी सर, व्ही.एस.बागडे सर,आर.ई.चांदेकर सर व आय.वाय.पठाण सर यांचा समावेश होता.
सकाळी ८ वाजता जुने तहसील कार्यालयासमोरील लिंबाचे झाडाखाली सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी व शिक्षक जमा झाले होते.तेथुन सवाद्य मिरवणुकीने हे सर्वजण ल.ना.होशिंग विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पोहोचले.तेथुनपुढे शालेय परीपाठ प्रार्थना होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
ल.ना.होशिंग विद्यालयातील डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम सभागृहामध्ये हा मेळावा संपन्न झाला.सुरुवातीला दिपप्रज्वलन तसेच सरस्वती पुजन त्यानंतर गुरुजनांचे सत्कार व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले.
सकाळचा चहा व नाष्टा तसेच दुपारचे भोजन व सायंकाळचा चहा या सर्व गोष्टीचे आयोजन कार्यक्रमामध्ये केलेले होते. सकाळी ८ वाजता सुरु झालेला हा मेळावा सायंकाळी ५ वाजता संपला संपुर्ण दिवसभर सर्व विद्यार्थी व शिक्षक कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक डाॅ.प्रताप बलभीम गायकवाड यांनी केले तर आभार सुरेश रामचंद्र देशमुख उर्फ सुंदरकाका देशमुख यांनी मानले. आपल्या खुमासदार शैलिने एस.एम.सरसमकर सरांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करुन कार्यक्रमामध्ये रंगत आणली. कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी सुरेश रामचंद्र देशमुख उर्फ सुंदरकाका देशमुख व डाॅ.प्रताप बलभीम गायकवाड या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी अपार मेहनत घेतली.