वाल्मिक कराडचे जामखेड कनेक्शन, पहा दुसऱ्या बायकोच्या नावावर व ड्रायव्हर च्या नावावर कुठे काय काय
राज्यातील विविध शहरात वाल्मिक कराडचे बँक खाते आहेत तसेच वेगवेगळ्या शहरात मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच ड्रायव्हर, दुसरी पत्नी कोट्यधीश आहे. यामुळे वाल्मिक कराडचे जामखेड कनेक्शन पुढे आले आहे. दुसरी पत्नी जामखेड तालुक्यातील असून तिच्या नावावर जामखेड, सोलापूर, पुणे येथे मोठ्या प्रमाणात मालमत्ता असून ड्रायव्हर च्या नावावर ही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे.
राज्यातील विविध शहरात वाल्मिक कराडचे बँक खाती व वेगवेगळ्या मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात सर्वात हायप्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटी आणि एफसी रोड भागात कराडची कोट्यवधी रुपयांची प्राँपर्टी असल्याचे समोर आले आहे.
वाल्मिक कराडचे पुण्यात एफसी रोड वर चार दुकाने आहेत त्याची किंमत 40 कोटी रुपये आहे. तर वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव ज्ञ जामखेड तालुक्यातील असून तिच्या नावावर पुण्यात एफसी रोड वर तीन दुकाने आहेत. तसेच जामखेड तालुक्यात 10 ते 15 एकर जमीन आहे. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात 50 एकर जमीन आहे. एवढी मोठी मालमत्ता समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वाल्मिक कराडचा ड्रायव्हर सुदाम बापुराव नरोडेच्या नावावर माजलगाव तालुक्यात पन्नास एकर जमीन आहे. मनिषा सुदाम नरोडेच्या नावावर 10 ते 12 एकर जमीन आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडी अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खंडणी प्रकरणात फरार आरोपी वाल्मिक कराड याच्याबद्दल गौप्यस्फोट केला. ज्योती जाधव ही वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला होता. यानुसार सीआयडी ने चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून असून संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी ज्योती जाधव यांची तब्बल चार तास चौकशी करण्यात आली होती. ज्योती जाधव ही वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला. कराड सुरुवातीच्या दिवसात तिच्याकडे राहायला असल्याचा दावा केला होता. या आश्चर्यकारक मालमत्तेच्या कनेक्शन मुळे एकच खळबळ उडाली आहे.