सावित्रीबाई फुले जयंती व वाढदिवसाच्या निमित्ताने राम व दादा घोडेस्वार यांच्या कडून विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप

0
455

जामखेड न्युज——

सावित्रीबाई फुले जयंती व वाढदिवसाच्या निमित्ताने राम व दादा घोडेस्वार यांच्या कडून विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप

वाढदिवसाचा खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होवू शकतात. हीच भावना लक्षात घेऊन राम घोडेस्वार व दादासाहेब घोडेस्वार यांनी साकत गावातील सर्व मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

दादा घोडेस्वार हे जामखेड येथील इंदिरा हाँस्पीटलमध्ये रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत आहेत. त्यांचा हा सामाजिक उपक्रम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप हा स्तुत्य उपक्रम घोडेस्वार यांचा सुरू आहे.

राम बन्सी घोडेस्वार हे मुंबई येथे एका खासगी हाँस्पीटल मध्ये काम करतात मुंबई येथे असुनही आपल्या गावाविषयी तळमळ आहे. गावातील विद्यार्थ्यांना आपल्या कडून काही तरी मदत मिळाली म्हाणून वह्या व पेनचे वाटप करण्यात आले.

सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद शाळा साकत येथे मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच 11.30 वाजता श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, प्रसाद होशिंग, मुकुंद वराट, विजय हराळे,अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह योगेश घोडेस्वार, अनिल घोडेस्वार, राजू घोडेस्वार विकी घोडेस्वार, सचिन घोडेस्वार, शिवाजी घोडेस्वार, श्रीकांत पुलवळे, बापू घोडेस्वार व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here