राम शिंदे यांना संवैधानिक पद समजलेच नाही – रोहित पवार
देशात दुखवटा व जिल्ह्यात जमावबंदी आदेश असताना मिरवणूक
सभापती राम शिंदे ज्या पदावर बसले आहेत ते संवैधानिक पद आहे वरीष्ठ सभागृहातील सभापती पद हे महत्वाचे आहे. कधाचीत त्यांना हे पद समजलेचं नाही सभापती झाल्यावर राम शिंदे यांची कर्जत – जामखेड येथे जल्लोषात मिरवणुक पार पडली. त्यावर बोलतांना रोहित पवार म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशाचे आहेत तसेच ते त्यांच्या पक्षाचे आहेत. त्यांनी काय आदेश काढले, काय निर्णय घेतले अख्खा आठवडाभर दुखवटा पाळायचा कोठेही जल्लोष करायचा नाही ही बाब राम शिंदे व कार्यकर्त्यांना समजली नाही.
त्यामुळे त्यांनी जल्लोषात कार्यक्रम केला. शेवटी तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. देशाचे दिवंगत पंतप्रधान मनमोहनसिंग हे मोठे नेते होते. सर्वच पक्षात त्यांना मान सन्मान होता. त्यांचा दुखवटा देशात पाळला जात असताना एवढा मोठा जल्लोष करून गुलाल उधळून स्वागत केले जात असेल तर एक ट्रक काय दोन ट्रक गुलाल खेळावा. अशा टोला आमदार रोहित पवार यांनी सभापती राम शिंदे यांना लगावला.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २१ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला होता तरीही सभापती प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी दि. २८ डिसेंबर रोजी कर्जत जामखेड शहरात भव्य दिव्य मिरवणूक काढली होती.
सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आठवडाभर दुखवटा जाहीर केला होता तसेच जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश काढलेला असताना या आदेशाला केराची टोपली दाखवत कर्जत जामखेड शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. आता यांच्या विरोधात काय कारवाई होणार असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे.