जामखेड तालुक्याचे दोन पैलवान महाराष्ट्र केसरी स्पर्धेत करणार अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व
जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा
जामखेड तालुक्यातील शिऊर व सातेफळ येथील शेतकरी पुत्र पैलवान वेगवेगळ्या वजन गटात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हे दोन्ही पैलवान जामखेड तालुक्याचा मोठा नावलौकिक करणार असा विश्वास परिसरातील नागरिकांना आहे.
आज झालेल्या श्रीरामपूर सरला बेट येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी जिल्हा निवड कुस्ती स्पर्धेमध्ये जामखेड तालुक्यातील शिऊर गावचा पैलवान सौरभ मारुती गाडे याने 74 किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे. यामुळे तो आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तसेच तालुक्यातील सातेफळ येथील पैलवान परमेश्वर विष्णू लटके यांचे वडील शेतकरी आहेत हा पुढील महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी 79 किलो वजन गटात नगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.
पैलवान सौरभ मारुती गाडे याने 74 किलो वजनगटात तर परमेश्वर विष्णू लटके हा 79 किलो वजन गटात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. यामुळे जामखेड तालुक्याचा मोठा सन्मान वाढला आहे.
कर्जत जामखेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे पैलवान संदीप लटके चा सर्व खर्च हे करत आहेत. याची जाणीव पैलवान लटके यांने ठेवून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे.
दोन्ही पैलवानावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व पुढील महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.