जामखेड शहरात गोळी सेंटर मध्ये दोन लाख ३५ हजाराचा गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
जामखेड शहरात गोळी सेंटरच्या नावाखाली बंदी असलेले दोन लाख ३५ हजार ८४४ रूपये किंमतीचे तंबाखू जन्य पदार्थ आर्थिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीसांनी हस्तगत करत दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तंबाखू जन्य पदार्थांचे विक्री व तयार करण्यास प्रतिबंध असलेला गुटखा पानमसाला तंबाखू जन्य विक्री करण्याच्या उद्देशाने दुकानात आढळून आल्याने आर्थिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीसांनी संयुक्त कारवाई करत २ लाख, ३५ हजार ८४४ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जामखेड शहरातील बीड रोडवरील जय भगवान गोळी सेंटर येथे प्रतिबंध असलेला गुटखा व पानमसाला तंबाखू जन्य पदार्थ आढळून आले तशी फिर्याद पोलीस काँन्स्टेबल कुलदिप घोळवे यांनी दाखल करत आरोपी छबू विश्वनाथ तोंडे वय ६५ रा सतेवाडी ता जामखेड व निलेश श्रीराम कोल्हे वय ३५ रा. राजुरी ता जामखेड या दोघांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीसांनी संयुक्त कारवाई करत बीड रोडवरील जय भगवान गोळी सेंटर मधुन दोन लाख ३५ हजार ८४४ रूपये किंमतीचा पानमसाला व सुंगंधी तंबाखू असा माल आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्याद पोलीस काँन्स्टेबल कुलदिप घोळवे यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार छबू विश्वनाथ तोंडे व निलेश श्रीराम कोल्हे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव करत आहेत.
शहरात अनेक ठिकाणी गोळी सेंटर तसेच पान सेंटर च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या तंबाखू जन्य पदार्थांची विक्री होते. अनेक वेळा स्थानिक पोलीस या गोष्टी कडे अर्थपुर्ण दुर्लक्ष करतात.