Wednesday, February 25, 2026
Home ताज्या बातम्या अतिक्रमण हटविण्यासाठी उद्या जामखेड शहर बेमुदत बंद!! अवधूत पवार यांच्या उपोषणाला...

अतिक्रमण हटविण्यासाठी उद्या जामखेड शहर बेमुदत बंद!! अवधूत पवार यांच्या उपोषणाला व बंदला सर्व पक्षीय पाठिंबा, पहा काय म्हणाले सर्व पक्षीय नेते

0
2

जामखेड न्युज——-

अतिक्रमण हटविण्यासाठी उद्या जामखेड शहर बेमुदत बंद!!

अवधूत पवार यांच्या उपोषणाला व बंदला सर्व पक्षीय पाठिंबा, पहा काय म्हणाले सर्व पक्षीय नेते

जामखेड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी जामखेड शहरातील रस्त्याच्या कामाला कायमस्वरूपी, अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी. दि. २६/०२/२०२६ पासून अतिक्रमण बाबत अंतिम कार्यवाही होईपर्यंत सर्व पक्षीय जामखेड शहर बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे. शासनाकडून जो पर्यंत अतिक्रमण काढण्याची कार्यवाही होत नाही तो पर्यंत बंद मागे घेतला जाणार नाही याची सर्व व्यापारी व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी. लगतच्या अतिक्रमण व अनियमिततेबाबत कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार हे आमरण उपोषणाला बसले आहेत. आज दुसरा दिवस आहे. उपोषणाला पाठिंबा म्हणून आज सर्व पक्षीय पाठिंबा देण्यात आला व उद्या पासून जामखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.

अतिक्रमण हटविण्यासाठी अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी

अतिक्रमण हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अधिकारी एस. बी चेमटे म्हणाले की, आमचा काही संबंध नाही. नगरपरिषदेने अतिक्रमण काढावेत तर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणाले की आमची सर्व तयारी आहे पण राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार सहकार्य करत नाहीत. यामुळे जामखेड शहराचा विकास खुंटला आहे. अतिक्रमण नेमके कोणी काढावयाचे हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी. लगतच्या अतिक्रमण व अनियमिततेबाबत
आज सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सर्व पक्षीय नेते यांनी पाठिंबा दिला यावेळी बोलताना काय म्हणाले नेते

अँड डॉ. अरूण जाधव
वंचित बहुजन आघाडीचे नेते

शासकीय जागेवर अतिक्रमण हटाव साठी दोन दिवसांपासून अवधूत पवार यांचे उपोषण सुरू आहे यास वंचित बहुजन आघाडी पाठिंबा जाहीर पाठिंबा
आहे. तसेच अतिक्रमणे निघावीत अशीच आमची भूमिका आहे.

राहुल उगले
राष्ट्रीय काँग्रेस नेते

राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या तीन वर्षापासून काम रखडलेले आहे. अतिक्रमणामुळे शहराचा विकास खुंटला आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण करावे लागत आहे. तरीही अधिकारी दखल घेत नाहीत. आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जामखेड बेमुदत बंद राहिल

राळेभात संपत
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट
उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही यामुळे उद्या पासून जामखेड बंद करण्यात येत आहे. याला आमचा पाठिंबा आहे.

पवन राळेभात (भाजपा)

दोन दिवस झाले उपोषण सुरू आहे. अतिक्रमणे निघावीत अशीच सर्वाची इच्छा आहे. तरीही
अधिकारी दखल घेत नाहीत. उपोषणाला व बंदला
आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत शहर बंद राहिल अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. नगरपरिषदेचा व भाजपा पुर्ण पाठिंबा
आहे.

शहाजी राळेभात
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट
शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत आम्ही
वेळोवेळी निवेदने दिली आहेत निम्मे काढले निम्मे अतिक्रमणे तसेच आहेत. लोकांची सोय व्हावी म्हणून सर्व जनतेचा बंद ला पाठिंबा आहे.

विकास राळेभात
अतिक्रमण हटविण्यासाठी
सर्वाचा पाठिंबा आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. काही लोकांनी अतिक्रमणे काढली तेथे परत अतिक्रमणे होत आहेत. परत अतिक्रमण होता कामा नये अतिक्रमणामुळे प्रकल्प रखडले आहेत.

अमित चिंतामणी
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग हा शहरातून जाणारा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावर आमचेही काही अतिक्रमण आहे आम्ही काढून घेण्यास तयार आहोत. तसेच अतिक्रमणामुळे विकास कामाला अडथळे निर्माण होत आहेत. शहरात धुळीचे साम्राज्य आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या आहेत. अतिक्रमणासाठी अधिकारी यांनी एकत्रित येऊन कारवाई करावी कोणावरही अन्याय करू नये.
पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण योजनेसाठी व विकासासाठी अतिक्रमण निघणे आवश्यक आहे.

पोपट राळेभात (उपनगराध्यक्ष)
रस्ता कामात अतिक्रमण अडथळा ठरत आहे. त्यामुळे अतिक्रमण निघणे आवश्यक आहे. उद्या बेमुदत बंद बाबत सर्वाना कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे .

प्रदीप टाफरे (मनसे)
जामखेड चा विकास अतिक्रमणामुळे रखडला आहे. राष्ट्रीय महामार्ग रस्ता काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त आहे. सारखेपणा नाही.
काम निकृष्ट दर्जाचे आहे. टपऱ्या निघाल्या मोठे अतिक्रमण तसेच आहेत उद्या च्या बंदला
मनसे पाठिंबा आहे.

अजहर काझी (मुस्लिम पंच कमिटी)
सर्व पक्षीय बैठकीत अतिक्रमण हटाव साठी जामखेड बंद बाबत सर्व मुस्लिम समाज बरोबर आहे. महाराष्ट्रातील जामखेड एकमेव शहर आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी सर्व समाज बरोबर आहे. आमचीही चार मजली इमारत आहे ती आम्ही काढू
सर्व काढा आम्ही आमचे शाळा कब्रस्थानचा काही भाग अडथळा ठरत असेल तर तेही अतिक्रमण काढून घेऊ.

शिवसेना युवानेते आकाश बाफना
स्वच्छ सुंदर जामखेड साठी तसेच धुळमुक्त व रहदारी मुक्त जामखेड साठी शिवसेनेचा बंद ला जाहीर पाठिंबा

यावेळी हनुमंत महाराज निकम, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष महेश निमोणकर यांनी ही बंदला जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी म्हणाल्या की, जामखेड शहराच्या विकासासाठी जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गास अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढून घ्यावेत
रस्ता मध्यापासून पंधरा मिटर पैकी 11.3 राष्ट्रीय महामार्ग व 3.7 नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजना व मलनिस्सारण योजनेसाठी आरक्षित आहे
योजना पुर्णत्वास जाण्यासाठी रस्ता दुतर्फा अतिक्रमण निघणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांना आवाहन करते की, शहर विकासासाठी आपण एक पाऊल पुढे येत जामखेड नगरपरिषदेला सहकार्य करावे ही विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!