जामखेड न्युज—–
भीमथडी जत्रेत चोरी करणारे चोर जामखेडचे
चार आरोपी अटक
भीमथडी जत्रा हा एक ग्रामीण आनंदोत्सव आहे ज्यामध्ये सांस्कृतिक प्रदर्शन, फूड मार्केट, फ्ली मार्केट, लाइव्ह शो, पॅकबंद/घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला, हातमाग, मांसाहारी पदार्थ आणि इतर बरेच काही समाविष्ट आहे. संपूर्ण ग्रामीण कार्निव्हलचा आनंद घेण्यासाठी हे एक स्टॉप जंक्शन असते याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. याच गर्दीचा फायदा काही चोर उचलतात या जत्रेत चोरी करणारे चार चोर पकडले ते जामखेड शहरातील निघाले आहेत.

पुण्याच्या भीमथडी जत्रेत सहभागी होण्यासाठी आणि कार्निव्हलमध्ये आपले स्टॉल आणि काउंटर लावण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. मात्र, लोकांच्या या प्रचंड गर्दीच्या वेळी चोरट्यांनी गर्दीचा गैरवापर करून अनेकदा चोरीच्या घटना घडल्या. अशाच एका घटनेत पुण्यातील भीमथडी जत्रेत स्टॉलधारक महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी ७१ हजार रुपयांची रोकड, पेनड्राइव्ह चोरुन नेला. ही चोरी तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे दिसून आले.

त्यावर शिवाजीनगर पोलिसांनी चौघा चोरट्यांना अटक केली आहे. मनोज भगतसिंग पवार (वय ४१), संदीप संजय गौड (वय ३२), रतिलाल प्रेमलाल परमार (वय ५५), विकी राजू साळुंखे (वय ३५,सर्व रा. येडा चौक, जामखेड, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चोरांनी असे पत्ते सांगितले आहेत.

याबाबत भाग्यश्री मंदार जाधव (वय २८, रा. आझर्डे, ता. वाई, जि. सातारा) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सिंचननगर येथील भीमथडी जत्रेत रविवारी सायंकाळी पाच वाजता घडला.





