ध्यान हा मनाचा आणि मेंदूचा व्यायाम – प्राचार्य बाळासाहेब पारखे ल.ना.होशिंग विद्यालयात “जागतिक ध्यान दिवस’ साजरा

0
308

जामखेड न्युज——

ध्यान हा मनाचा आणि मेंदूचा व्यायाम – प्राचार्य बाळासाहेब पारखे

ल.ना.होशिंग विद्यालयात “जागतिक ध्यान दिवस’ साजरा

मेडिटेशन किंवा ध्यान हा एक मानसिक व्यायाम आहे, ज्यामध्ये विश्रांती, एकाग्रता आणि जागरुकता यांचा समावेश होतो. ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम हा आपल्या शरिराच्या हालचालींसाठी कार्य करते. अगदी, त्याचप्रमाणे ध्यान हा मनाचा आणि मेंदूचा व्यायाम आहे असे मत प्राचार्य बी. ए. पारखे यांनी व्यक्त केले.

जामखेड शहरातील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल.ना.होशिंग विद्यालयात आज दिनांक दि.२१ डिसेंबर हा ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. आधुनिक काळातही ध्यानाचे महत्त्व कायम असून ध्यानधारणा ही प्राचीन काळापासून विकसितआहे. आजच्या आधुनिक जगातील बदलांना सामोरे जाताना तसेच मानसिक शांती मिळविण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक आहे.अशा धावपळीच्या जीवनात योगासनांचे धडे घेतले पाहिजे.असे मत प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

ध्यान हा एक सराव आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती माईंडफूलनेस सारखी पद्धत वापरून विशिष्ट वस्तू, विचार किंवा गती यावर लक्ष केंद्रित करत.
जेणेकरून जागरूकता आणि एकाग्रता वाढवली जाऊ शकेल. ध्यानाचा सराव हा एखाद्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या स्पष्ट करतो आणि भावनिकदृष्ट्या शांतता आणि स्थिरता प्रदान करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here