जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यापासून जामखेड पोलिसांचे मनोधैर्य उंचावले.
सर्व सामान्य नागरीकांना पोलीसांबद्दल आपलेपणा वाटू लागला. पोलिसांचा कारभार गतिमान झाला. ‘पेंडिंग’ गंभीर गुन्ह्यातील तब्बल अडिच डझन आरोपी गजाआड केले. अवैध देशी दारूचे अड्डे उद्धवस्त करण्याचा सपाटा लावला. अफूची शेती करणाऱ्यांनाही अटक केली. खाजगी सावकाराविरोधात धडक मोहीम राबवत सर्व सामान्य नागरीकांना न घाबरता तक्रार करण्यासाठी आवाहन केले. तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता सामान्य नागरीकांना पोलीसांबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. आता तर पोलीस ठाण्यात विविध ठिकाणी दर्शनी भागात नागरिकांना आवाहनाचे फलक लावले आहेत.

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पदभार स्विकारताच आपल्या कल्पकतेने संपुर्ण स्टाफला विश्वासात घेतले. सर्व सामान्य नागरीकांना पोलीसांबद्दल विश्वास वाटेल अशी वागणूक तक्रारदारांना वाटू लागली. शहरातील रहदारीला योग्य शिस्त लावली. खाजगी सावकाराविरोधात तक्रार करण्याचे आवाहन केले यामुळे ज्या लोकांना खाजगी सावकाराचा त्रास झाला त्यांनी न घाबरता तक्रार केली तसेच पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या दर्शनी भागात फलक लावून जनतेला आवाहन केले आहे. ते फलक पुढीलप्रमाणे आहेत.
आपल्या तक्रारी बाबत आपले समाधान झाले नाही
का ❓
आपल्या कडून गैरप्रकारे पैशाची अगर कोणत्याही बाबीची मागणी करण्यात येते का ❓
असे होत असेल तर तात्काळ आम्हाला एसएमएस, व्हाॅटस्अॅप मेसेज, फोन करून किंवा समक्ष भेटा यासाठी त्यांनी फोन नंबर देऊन जनतेला जाहिर आवाहन केले आहे.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या कल्पनेतून असे फलक लावण्यात आले आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पोलीसांबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.