एक व्यक्ती एक झाड उपक्रमाची कारगिल विजय दिवसा निमित्त सुरुवात – वृक्ष लागवडी बरोबरच वृक्ष संवर्धन महत्त्वाचे – न्यायाधीश रजनीकांत जगताप

0
253
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने जामखेडमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शहीद भारतीय जवानांना आदरांजली अर्पण करून मानवंदना दिली. न्यायाधीश रजनीकांत जगताप यांचे हस्ते”एक  पौधा-एक संकल्प” उपक्रमा निमित्त वृक्षारोपणाची सुरवात करण्यात आली.
यावेळी न्यायाधीश रजनीकांत जगताप, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,  प्रा. मधुकर राळेभात, मुख्याधिकारी मिनींनाथ दंडवते, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, कृषी अधिकारी सुधीरजी शिंदे , वैद्यकीय अधिकारी संजय वाघ,आरोग्य अधिकारी सुनील बोराडे, प्राचार्य अविनाश फलके, प्राचार्य बी.के.मडके, प्राचार्य श्रीकांत होशीग, सीआरपीफचे गणेश भोसले, आरोग्य विभागाचे आदिनाथ गीते, एनसीसी अधीकारी गौतम केळकर, अनिल देडे, मयुर भोसले, रमेश बोलभट, प्रवीण उगले, अकाश डोके, ॲड संग्राम पोले, हर्षल डोके, डॉ सागर शिंदे, बजरंग डोके, पत्रकार प्रकाश खंडागळे, अशोक निमोणकर, सुदाम वराट, पपुभाई सय्यद , अजय अवसरे , पो कॉ प्रकाश जाधव, धनराज बिराजदार, पो. हे. कॉ पालवे   तसेच पोलिस विभाग , आरोग्य विभाग , न्यायालय विभाग ,जामखेड नगर परिषद, शिक्षक , आजी-माझी सैनिक व एनसीसी छात्र  यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहून  सर्वानी “एक  पौधा-एक संकल्प”उपक्रमात वृक्षारोपण करून  आपले कर्तव्य केले.
           देश भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. जामखेड महाविद्यालय, ल ना होशिंग विद्यालय,व रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय मधील एनसीसी कॅडेट उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी
   कारगिल विजय दिवसा निमित्त एनसीसीचा “एक पौधा -एक संकल्प” उपक्रम कौतुकास्पद आहे  व प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष लागवड करून ते जोपासवे, कोरोणाची पार्श्वभूमी पाहता वृक्षारोपण व संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.या मध्ये सर्वानी सहभाग घ्यावा.असे मनोगत व्यक्त केले.
        पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी कारगिल विजयाची माहिती  दिली. विद्यार्थ्यांनी सैन्यात भरती व्हावे व देशसेवा करावी तसेच वृक्षारोपण करून संवर्धन करणे हि पण देशसेवाच आहे असे सांगितले
प्रा. मधुकर राळेभात यांनी आदरांजली वाहून मनोगत व्यक्त केले.
   या उपक्रमासाठी जामखेड नगर परिषदेचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here