नवभारत साक्षरता सर्वेक्षणावर जामखेड तालुका माध्यमिक शिक्षकांचा बहिष्कार
शिक्षकांना शैक्षणिक कामे, ऑनलाईन माहिती ही कामे असतानाच नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणाच्या आदेशामुळे शिक्षक त्रस्त होते. त्याचा परिणाम विद्यार्थी गुणवत्तेवर तसेच शिक्षकांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. या सर्वांचा विचार करत अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेने नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षण बहिष्कार असल्याचे निवेदन शिक्षण विभागास दिले आहे.
शिक्षक संघटनेचे नेते शिवाजीराव ढाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष प्रवीण गायकवाड, उपाध्यक्ष मोहळकर आर.बी., सहसेक्रेटरी वराट एस.के , शिंदे एस.एल.मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दशरथ कोपनर, सचिव आप्पा शिरसाठ, टि डी एफ उपाध्यक्ष देडे ए.के., सचिव भरत लहाने, दत्तात्रय राजमाने, बी.आर.इथापे, ससाणे सर , साळुंके सर, गाडे सर, फुंदे सर, समुद्र सर, संतोष देशमुख, अनिल काळे, संजय सरडे , देशमुख एस .आर. हे उपस्थित होते.
शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा, त्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा व शिक्षकांच्या मानसिक स्वास्थ्याचा विचार होत नसल्याने याचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होत आहे. मुळातच राज्यामध्ये शिक्षकांच्या तीस हजाराहून अधिक जागा रिक्त आहेत. त्याचाही परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास प्राधान्य नवभारत साक्षरता सर्वेक्षण अंतर्गत अन्य सर्वेक्षणाचे काम शिक्षकांकडून करून घेण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास प्राधान्य देत महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटना म्हणून राज्यातील सर्व संघटनांकडून नवभारत साक्षरता कार्यक्रम सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वेक्षणावर बहिष्कार टाकत असल्याबाबतचे पत्र राज्याचे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांना देण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली आज जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने नवभारत साक्षरता सर्वेक्षणावर शिक्षकांचा बहिष्कार असे निवेदन संघटनेच्या वतीने शिक्षण विभागास दिले आहे.