आमदार रोहित पवार यांच्या कडून सभापती प्रा राम शिंदे यांचे अभिनंदन
विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सभापती महोदय मा. प्रा. राम शिंदे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन आमदार रोहित पवार यांनी अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी आमदार रोहित आबा पाटील, मा. आ. प्रकाश गजभिये साहेब आणि रविकांत बोपचे हेही उपस्थित होते. स्व. ना. स. फरांदे साहेबांनंतर विधानपरिषदेचे सभापती या सर्वोच्च पदापर्यंत पोचलेले प्रा. शिंदे साहेब अहिल्यानगर जिल्ह्यातील दुसरे नेते आहेत, ही निश्चितच गौरवाची बाब आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीच्या लढतीत आमदार रोहित पवार यांचा निसटता विजय तर आमदार प्रा राम शिंदे यांचा पराभव झाला होता. अल्पशा मतांनी पराभव झाल्याने पक्षाने आमदार शिंदे यांना विधानपरिषदेचे सभापती केले आहे यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे. आमदार रोहित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
2019 मधेही रोहित पवार विजयी झाल्यानंतर चौंडी येथे जाऊन आमदार प्रा राम शिंदे यांच्या कडून सन्मान घेतला होता. आमदार शिंदे यांनी त्यांचा घरी सत्कार केला होता.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार अशी चर्चा सध्या कर्जत जामखेड मतदारसंघात जोरात सुरू आहे.