आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून जामखेड तालुक्यातील नऊ शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप पाच शाळांना E – Pdium ( ई पोडियम) तर चार शाळांना संगणक संच

0
647

जामखेड न्युज——

आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून जामखेड तालुक्यातील नऊ शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप

पाच शाळांना E – Pdium ( ई पोडियम) तर चार शाळांना संगणक संच

शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे एक अभ्यासू आमदार म्हणून अल्पावधीतच आमदार सत्यजित तांबे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. जामखेड तालुक्यातील नऊ शाळांना आपल्या विकास निधीतून ई साहित्य दिले आहे. पाच शाळांना E – Pdium ( ई पोडियम) तर चार शाळांना संगणक साहित्य देण्यात आले आहे. यामुळे या शाळांना निश्चितच शैक्षणिक फायदा होणार आहे.

जामखेड तालुक्यातील जिजामाता विद्यालय घोडेगाव, नागेश विद्यालय, न्यु इंग्लिश स्कूल खर्डा, ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड, संत नंदराम महाराज विद्यालय धामणगाव या पाच शाळांना अत्याधुनिक E – Pdium ( ई पोडियम) देण्यात आले आहे. तसेच आणखेरी देवी विद्यालय फक्राबाद, चन्नप्पा विद्यालय पिंपळगाव उंडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फक्राबाद, हनुमान माध्यमिक विद्यालय दिघोळ या चार शाळांना संगणक देण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2024 मध्येही जामखेड तालुक्यातील सात शाळांना संगणक देण्यात आले होते.

अत्याधुनिक E – Pdium ( ई पोडियम) ची किंमत बाजारात दोन लाखांपेक्षा जास्त आहे. असे पाच संच देण्यात आले आहेत.

आज ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वरील शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांकडे साहित्य देण्यात आले. यावेळी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, प्राचार्य बी. ए. पारखे, मा. प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य दशरथ कोपनर, जामखेड चे समन्वयक विकास पवार, कर्जत समन्वयक इमानदार ए. एम, श्रीगोंदा समन्वयक राजकुमार साळवे, उपमुख्याध्यापक पी. टी. गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने, भरत लहाने, अनिल देडे, किशोर कुलकर्णी, जाकीर शेख, बाळासाहेब रोडे, कैलास घुमरे, बोराटे सर, गाडे सर, शिरसाठ सर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार सत्यजित तांबे यांच्या तर्फे फेब्रुवारी 2024 मध्येही जामखेड तालुक्यातील सात शाळांना संगणक देण्यात आले होते. आता परत चार शाळांना संगणक व पाच शाळांना अत्याधुनिक असे E – Pdium ( ई पोडियम) देण्यात आले आहे. तसेच एवढेच साहित्य प्रत्येक तालुक्यात देण्यात आले आहे. यामुळे शाळांचा निश्चितच शैक्षणिक फायदा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here