जामखेडमध्ये महावितरणच्या कार्यालयात दत्त जयंती उत्साहात साजरी

0
341

जामखेड न्युज——

जामखेडमध्ये महावितरणच्या कार्यालयात दत्त जयंती उत्साहात साजरी

सालाबादप्रमाणे याही वर्षी जामखेड महावितरण येथे मोठ्या उत्साहात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री.कटक धोंड साहेब यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत पूजा करण्यात आली.
सायंकाळी 06:00 वाजता दत्त जन्मोत्सव दत्त भक्त महिला, पुरुष व अबाल वृध्द यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

दत्त जन्मोत्सवानंतर महावितरण कर्मचारी यांच्या वतीने सर्व दत्त भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी अधिकारी व कर्मचारी व भक्तजन उपस्थित होते.

सदर दत्त मंदिर ची स्थापना सन.1976 साली त्या वेळेस चे स.अभियंता श्री.पांडे साहेब कि जे कार्य.अभियंता म्हणून मुंबई कार्यालयातून सेवा निवृत्त झाले त्यांचे प्रेरणेतून श्री.दत्त मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा झाली व ते आजही दत्त जयंती उत्सवा करिता आमचे सहकारी प्र.यंत्र चालक श्री.गोलांडे साहेब यांचे मार्फत 501 /- रु वर्गणी देतात.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी
फाळके साहेब,चोरगे साहेब, कापसे साहेब, विक्रांत निकाळजे, परमेश्वर रणदिवे यांनी सहकार्य केले. 

श्री.कटकधोंड साहेब उपकार्यकारी अभियंता जामखेड उपविभाग, श्री.राठोड साहेब सहाय्यक अभियंता जामखेड शहर, श्री. उपाध्ये साहेब सहाय्यक अभियंता अरणगाव कक्ष,श्री.खांडेकर साहेब सहाय्यक अभियंता खर्डा कक्ष, श्रीमती चव्हाण मॅडम कनिष्ठ अभियंता, श्री. कदम साहेब सहाय्यक लेखा, श्री.केदार साहेब उच्चस्तर लिपिक
जामखेड उपविभागातील महावितरण चे सर्व कर्मचारी.
अन्नदाते सालाबाद प्रमाणे करत असतात
शशिकांत राऊत, वरद सुपर मार्केट, वैभव किराणा स्टोअर्स, किसन पेचे, बबलू पवार, राजू फिटर, सुरेश पवार, फुटाणे, शंकर डाडर हे अन्नदान करतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here