जामखेड न्युज——
जामखेडच्या योगेश वाघमोडेने मिळवून दिले महाराष्ट्राला रौप्यपदक
केंद्र शासनाच्या क्रिडा व युवक मंत्रालय,स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया व वुशू असोसिएशन ऑफ दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागराज स्टेडियम दिल्ली येथे पार पडलेल्या 68 व्या राष्ट्रीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत जामखेडच्या ल ना होशिंग विद्यालयात शिकणारा योगेश वाघमोडे यांनी चमकदार कामगिरी करत महाराष्ट्राच्या संघाला रौप्यपदक मिळवून दिले आहे. याबाबत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जुलै महिन्यात झालेल्या फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्राँझ पदक मिळविले आहे,त्याची सर्व क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
योगेश वाघमोडे याला अहिल्यानगर जिल्हा वुशू असोसिएशनचे सचिव प्रा.लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष शाम पंडित वुशू प्रशिक्षक आबा जायगुडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.