गेल्या वर्षी याच दिवसांत परिसरात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. तसेच भुतवडा परिसरात काही शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या रात्री साकत घाटामध्ये धनंजय कार्ले यांच्या गाडीला बिबट्या आडवा गेला तो डोंगराकडील भागात गेला आहे. तरी साकत, सावरगाव, धोत्री तसेच या परिसरातील गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जामखेड वरून साकतला मोटारसायकल वर ये जा करणारे अनेक प्रवासी आहेत रात्रीही अनेक जण एकटे ये जा करतात तसेच सध्या ज्वारी पिकास पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावे लागते. तेव्हा वनविभागाने ताबडतोब बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सौताडा, भुतवडा, तसेच डोंगर पट्ट्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. कधी वन्य प्राण्यांवर उपजीविका करतात पण वन्य प्राणी मिळाले नाहीत तर जंगलाच्या बाजूला चरत असलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षी जामखेड तालुक्यातील जातेगाव, नायगाव, धामणगाव, मोहरी, दिघोळ परिसरात बिबट्या असल्याच्या बातम्या येत होत्या वनविभागाने अनेक वेळा पिंजरा लावूनही बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते. तसेच धामणगाव येथे एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला होता. तर महिन्यांपूर्वी आरणगाव येथे एका विहिरीत बिबट्या सापडला होता.
चौकट
नागरिकांनी अंधारात एकटे फिरू नये, बॅटरी बरोबर ठेवावी, मोबाईल वर गाणे लावावीत, शेळ्या, मेंढ्या, वासरे कुंपणाच्या आत ठेवावेत हातात नेहमी काठी असावी. आपल्या पशूंची काळजी घ्यावी.