जामखेड महाविद्यालयातील खेळाडूंचे बॉक्सिंग स्पर्धेत चार सुवर्ण व दोन रौप्य पदक मिळवत चमकदार कामगिरी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने न्यु आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालय पारनेर येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत जामखेड महाविद्यालयातील खेळाडूंनी अप्रतिम खेळाच्या जोरावर सुवर्ण कामगिरी केली. 1) शिरगिरे मोहिनी 48-50 kg (सुवर्ण पदक) 2) शादाब शेख 80-86 kg (सुवर्ण पदक) 3) रोहित घुगे 86-92kg (सुवर्ण पदक) 4) सूर्यप्रताप सदाफुले 75-80 kg (सुवर्ण पदक) 5) सिद्धांत अंदुरे 54-57 kg (रौप्य_पदक) 6) कोमल डोकडे 57-60 kg (रौप्य पदक) या सर्व खेळाडूंनी प्रति स्पर्धकावर मात करून पदक संपादन केले आहे.
वरील सर्व खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. आण्णा मोहिते यांनी मार्गदर्शन केले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. उद्धव (बापू) देशमुख, उपाध्यक्ष मा. अरुण (काका) चिंतामणी, संस्थेचे सचिव मा. शशिकांतजी देशमुख, खजिनदार राजेशजी मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल.डोंगरे यांनी या विद्यार्थ्यांचे तसे त्यांचे मार्गदर्शक डॉ. अण्णा मोहिते यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डोंगरे एम.एल. म्हणाले की महाविद्यालयाच्या नाव लौकीकात भर घालणाऱ्या या सर्व यशस्वी खेळाडूंचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
27 नोव्हेंबर रोजी भारतीय जैन संघटनेचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज वाघोली पुणे येथे संपन्न होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. नजीकच्या काळात होणाऱ्या नॅक् साठी या सर्व बाबींची निश्चितच मोलाची भर पडणार आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या सर्वांचे सर्व संचालक मंडळ व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.