जामखेड न्युज——
मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी आलेल्या बाहेरील कार्यकर्त्यांच्या जिल्ह्यातील उपस्थितीवर निर्बंध
विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया शांततेत, निर्भयपणे आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी प्रचार कालावधी संपल्यानंतर बाहेरील मतदारसंघातील राजकीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवर निर्बंध घालणारे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जारी केले आहेत.
प्रचार संपल्यानंतर मतदारसंघात कोणताही प्रचार होऊ नये यासाठी मतदारसंघाचे मतदार नसलेल्या आणि मतदारसंघाच्या बाहेरून आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना त्या मतदारसंघात उपस्थित राहता येणार नाही.
बाहेरील कार्यकर्त्यांची सतत उपस्थिती मुक्त व निष्पक्ष मतदानावर परिणाम करू शकते, त्यामुळे प्रचार संपताच बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघ सोडणे बंधनकारक असणार आहे.