जामखेड न्युज——
आमदार प्रा राम शिंदे निवडून येणार व मंत्री होणार – बाबुशेठ टायरवाले
आमदार प्रा राम शिंदे यांच्या जलसंधारणच्या कामामुळे शेतकऱ्यांना खुप फायदा – प्रा. कैलास माने
अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यात भाजपा शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे आमदार प्रा राम शिंदे हे बहुमताने निवडून येणार आहेत आणि मंत्रीही होणार आहेत असे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी जामखेड येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत मोठ्या घराण्यातील उमेदवार आला मोठ मोठे आश्वासन दिले पण पाच वर्षांत काहीही काम केले नाही यामुळे या निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे असेही टायरवाले यांनी सांगितले.
भाजपा शिवसेना युती आहे आमचे सर्व शिवसैनिक युती धर्म पाळणार आहोत. जर कोणी काम केले नाही तर त्याच्यावर गद्दारावर कारवाई करणार असेही सांगितले.
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने यांनी सांगितले की, आमदार प्रा राम शिंदे यांनी केलेल्या जलसंधारण कामामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. यामुळे आमदार प्रा राम शिंदे निवडून येणार आहेत.
कर्जत जामखेड मधील जनतेला आमदार प्रा राम शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.