पाच वर्षांत जामखेड तालुक्यात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून अमुलाग्र बदल झाला आहे. रस्ते वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. मतदारसंघात विकासाच्या बळावर आणि सुरक्षिततेसाठी रोहित पवार यांना विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी व्यक्त केला.
पाच वर्षांत मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास केलेला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी आणून आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, पाणीपुरवठा यात मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. तसेच आमदार रोहित पवार यांच्या मुळे मतदारसंघात सुरक्षितता निर्माण झाली आहे
आमदार रोहित पवार यांच्या विकास कामामुळे ते महाराष्ट्रभर प्रचार करत आहेत. मतदारसंघात अनेक नेते रोहित पवार यांना सोडून गेले आहेत पण सर्व सामान्य जनता आजही विकास कामामुळे रोहित पवार यांच्या बरोबर आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी एमआयडीसी आणण्यासाठी खुप प्रयत्न केला पण त्याला विरोध झाला यामुळे बेरोजगार तरुणांचा मोठा रोष भाजपा सरकार वर आहे.
आमदार रोहित पवार यांनी रस्ते, प्रशासकीय इमारती, उपजिल्हा रूग्णालय, बस स्थानक, पोलीस वसाहत या भव्य दिव्य इमारती झालेल्या आहेत. यामुळे सर्व सामान्य जनता आमदार रोहित पवार यांच्या बरोबर आहे त्यामुळे जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळणार आहे.
मतदारसंघात शांतता व सुरक्षितता निर्माण होण्यासाठी आमदार रोहित पवार आवश्यक आहेत असे सर्व सामान्य जनता, व्यापारी यांचे मत आहे त्यामुळे जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळणार आहे.
रोहित पवार आजही फक्त विकासावरच बोलत आहेत कोणावर टिका टिप्पणी करत नाहीत. कारण विकास कामाचे मोठे व्हिजन त्यांच्या कडे आहे. रोहित पवार हे नामदार होणार आहेत तसेच भविष्यात हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मताधिक्य रोहित पवार यांना मिळणार आहे असे उपसभापती कैलास वराट यांनी सांगितले.