ऐतिहासिक शिवपट्टन किल्यावरील बेकायदेशीर पैशाची मागणी व अवैध धंदे बंद करावेत – पांडुरंग भोसले

0
554

जामखेड न्युज——-

ऐतिहासिक शिवपट्टन किल्यावरील बेकायदेशीर पैशाची मागणी व अवैध धंदे बंद करावेत – पांडुरंग भोसले

 

 

ऐतिहासिक शिवपट्टन किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून बेकायदेशीर पणे करण्यात येणारी पैशाची मागणी तसेच किल्ला परिसरातील अनाधिकृत व्यवहार ताबडतोब थांबवावेत अन्यथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार जामखेड, पोलीस उपनिरीक्षक खर्डा, ग्रामपंचायत खर्डा यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

 

जामखेड तालुक्यातील शिवपट्टन ( खर्डा ) शहराचे वैभव असलेल्या मराठ्यांच्या विजयाचे प्रतिक किल्ले शिवपट्टण येथे शिवप्रेमी व पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे व पर्यटनातुन स्थानिक व्यावसायिकांना फायदा देखील होत आहे.

 

असे असताना देखील किल्याच्या गेटवर बेकायदेशीर पणे एक महिला तसेच तरुण किल्ला पाहण्यासाठी येणारे पर्यटकांना व शिवप्रेमींकडुन जबरदस्तीने पैसे मागत आहे.

जर पर्यटकांनी पैसे दिले नाही तर शिवीगाळ केली जाते तसेच कुठलीही पैशाची पावती दिली जात नाही यांची गंभीर दखल घेउन योग्य ती कार्यवाही करावी अनेक वर्षापासून खर्डा किल्ल्यासाठी शिपाई ची नेमणुक करावी यासाठी शिवप्रेमींनी अनेक वेळा पत्र व्यवहार केलेला असुन पुरातत्व विभागाकडून अजुनही दखल घेतली गेलेली नाही.


आलेल्या पर्यटकांच्या गाडीतील पेट्रोल चोरीचे प्रकार घडत आहेत. किल्याच्या आत मध्ये दारू, जुगार, आश्लील प्रकार देखील होत आहेत असे निदर्शनास आले आहे त्यामुळे तेथे येणारे शिवप्रेमी व पर्यटकांच्या भावना दुखावल्या जातात व ही बाब आपल्या जामखेड तालुका व खर्डा शहरासाठी खुप लाजीरवाणी गोष्ट आहे.

यासर्व बाबींचा विचार करुन आपण खर्डा ग्रामपंचायत मार्फत किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर एका शिपायाची कायमस्वरूपी नेमणूक करावी जेणे करुन या सर्व गोष्टीवर आळा बसेल व किल्ल्याचे संवर्धन ही राखले जाईल तरी आपण समस्त शिवप्रेमींच्या मागणीची दखल घेऊन आपल्या ग्रामपंचायती मार्फत ताबडतोब कर्मचारी नेमण्यात यावा हि विनंती शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका अध्यक्ष पांडुराजे मधुकर भोसले, संकेत सातपुते, रोहीत गोलेकर, तेजस चावणे, गणेश ढगे, ओंकार इंगळे, गोटु वाळुंजकर, नाना ईगंळे , बाळासाहेब ढाळे यांच्या सह अनेक धारकरी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here